सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३०३ कोटी इतका खर्च येणार असून . या पुलामुळे दोन फायदे होतील पुलामुळे वाहतूक कोंडीही दूर होईल. मिठी नदीचा प्रवाह सुद्धा सुरळीत होईल. असा दावा महापालिकेने केला आहे.


२००५ च्या अतिवृष्टीनंतर डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मिठी नदीचे पात्र सध्याच्या ६८ मीटरवरुन १०० मीटर पर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच शीव - धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रेला जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी करून रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. आणि ही कामं दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.


वांद्रे पूर्व येथील ड्राईव्ह इन थिएटर जवळून मिठी नदी वाहते. आणि या मिठी नदीवरून जाणाऱ्या पुलावरून वाहनांची गर्दी वाढली आहे. सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी, आणि कलिना येथे जाण्यासाठी धारावी येथील पूल महत्वाचा मानला जातो. पुलाची रुंदी कमी असल्याने प्रवाश्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात मिठी नदी तुडुंब वाहू लागते त्यामुळे पुलाची रुंदी आणि उंचीही कमी असल्याने पाण्याच्या प्रवासातही अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.


आणखी एका पुलाची उभारणी


जुना पूल पाडल्यावर नवीन भक्कम पूल बांधेपर्यंत त्याला पर्याय म्हणून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पुलाच्या बाजूलाच एक तात्पुरता पूल बांधण्यात येणार आहे

Comments
Add Comment

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला