शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून पुणे शहरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटना, पतित पावन संघटना आणि भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. शनिवार वाड्याच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं. परिसरात गोमूत्र शिंपडून 'शुद्धीकरण' करत 'शिववंदना' करण्यात आली.


भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. याआधी त्यांनीच शनिवार वाड्यातील नमाज पठणाचा व्हिडीओ एक्स पोस्ट केला आणि यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा दिला. त्या म्हणाल्या, "शनिवार वाडा हे केवळ ऐतिहासिक स्थळ नाही, तर मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. येथे नमाज पठण करणे दुर्दैवी असून, अशा कृतींना आमचा तीव्र विरोध आहे."



सदर प्रकारानंतर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्याच्या परिसरात आंदोलन केले. शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडले आणि शुद्धीकरण करून या ठिकाणी 'शिववंदना' केली. तसेच, पूर्वी येथे साजरा होणारा माघी गणेश उत्सव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. आंदोलकांनी परिसरात असलेल्या एका मजारवर आक्षेप घेत भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकवू न दिल्याने आंदोलकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या ठिकाणी असलेली मजार अनधिकृत असल्याचे सांगत ती लवकरात लवकर हटवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.


पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ वाद झाला. आंदोलक म्हणाले की, "इथे हिरवा झेंडा फडकावला जातो तेव्हा पोलिस कुठे असतात ? ज्या वेळी येथे नमाज पठाण झाले तेव्हा पोलीस कुठे होते ? आम्ही भगवा झेंडा फडकवू इच्छितो तेव्हा अडथळे का आणले जात आहे ?" अखेरीस आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने त्यांना झेंडा फडकवण्याची परवानगी दिली.


सदर प्रकरणानंतर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या ठिकाणी कोणत्याही धार्मिक कृतींना परवानगी असावी का, यावर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी