IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वन-डे सामना आज पर्थमध्ये रंगणार

कॅनबेरा : - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवारपासून सुरू होत आहे. सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. जे दीर्घ विश्रांतीनंतर भारतीय जर्सीमध्ये मैदानावर परतणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हे दोन अनुभवी क्रिकेटपटू पहिल्यांदाच खेळतील. रोहित आणि कोहली या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून खेळले आणि आता मैदानात परतणार आहेत.


गेल्या सात महिन्यांत रोहित आणि कोहलीसाठी बरेच काही बदलले आहे. दोघेही २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचे लक्ष्य ठेवत आहेत. पण ही मालिका जागतिक स्पर्धेसाठी त्यांची तंदुरुस्ती निश्चित करेल. दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात सराव केला आहे. रोहितने वजन देखील कमी केले आहे. पण फॉर्ममध्ये परतणे दोघांसाठीही एक आव्हान असेल. कारण ते आयपीएलपासून खेळलेले नाहीत. दोघांसाठीही चांगली बाब अशी आहे की, त्यांचे पुनरागमन ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. कांगारुंविरुद्ध त्यांचा चांगला रेकॉर्ड आहे. ही मालिका त्यांच्या कारकिर्दीची भविष्यातील दिशा ठरवणारी आहे.


रोहित आणि कोहली आता भारतासाठी फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतात. ते पुन्हा एकदा मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवुडशी सामना करतील. रोहित कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त होईल. ज्यामुळे तो मुक्तपणे खेळू शकेल. रोहित आणि कोहली यांच्या मनात २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक असेल यात शंका नाही. जर कोहली त्याच्या नेहमीच्या शैलीत लांब डाव खेळला आणि रोहितने चांगली सुरुवात केली. तर दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंची कारकीर्द आणखी काही वर्षे वाढू शकते.


गिलने कसोटीत भारताचा कर्णधार म्हणून आपले कौशल्य दाखवले आहे. आणि आता त्याच्यासमोर एकदिवसीय सामन्यांमध्ये ही गती कायम ठेवण्याचे आव्हान आहे. गिलसाठी आनंदाची बाबअशी आहे की, त्याला अशा वेळी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जेव्हा रोहित आणि कोहली देखील संघाचा भाग आहेत. त्याला या दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंकडून सल्ला घेण्याची संधी मिळेल. संघ संयोजनाबाबत, संघ व्यवस्थापन रोहित आणि गिलच्या सलामी जोडीशी छेडछाड करेल अशी शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत, यशस्वी जयस्वालला त्याच्या संधीची वाट पहावी लागू शकते.


रोहित आणि गिल डावाची सुरुवात करतील, तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल. राहुलकडे विकेटकीपिंगचीही जबाबदारी असेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकत नाही. त्यामुळे नितीश कुमार रेड्डीला एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करतील, तर मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग जलद गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या