पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाहंचा झंझावात दिसणार


पाटणा : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारसभांचा झंझावात दिसणार आहे. पंतप्रधान मोदींच्या बिहारमध्ये १२ प्रचासभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये २५ प्रचारसभा घेणार आहेत.


पंतप्रधान मोदी २३ ऑक्टोबर रोजी सासाराम, गया, भागलपूर यानंतर २८ ऑक्टोबर रोजी दरभंगा, मुझफ्फरपूर, पाटणा नंतर १ नोव्हेंबर रोजी छपरा, पूर्व चंपारण, समस्तीपूर आणि ३ नोव्हेंबर रोजी पश्चिम चंपारण, सहरसा, अररिया येथे प्रचारसभा घेणार आहेत. मोदींच्या १२ प्रचारसभांचा कार्यक्रम भाजपने जाहीर केला आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये २५ प्रचारसभा घेणार आहेत.


बिहारमध्ये एनडीएने (रालोआ) निवडणुकीसाठी समन्वय राखला आहे. पण विरोधकांना समन्वय राखणे जमलेले नाही. अनेक जागांवर विरोधकांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार दिल्याचे चित्र आहे. विरोधकांमधील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे.


यावेळी बिहारमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान घेतले जाईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एकूण ७ कोटी ४३ लाख मतदार आहेत. यामध्ये ३ कोटी ९२ लाख पुरुष आणि ३ कोटी ५० लाख महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा सुमारे १४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० मतदार असतील. मतदानाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना त्यांची नावे नोंदवता येणार आहेत, तर एसआयआरच्या माध्यमातून अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजीच जाहीर करण्यात आली आहे.


निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर, निवडणुकीच्या काळात प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर (बनावट बातम्यांवर) कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सर्व मतदान केंद्रांवर हिंसाचारावर शून्य सहनशीलतेचे (Zero Tolerance) निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील. वृद्ध मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर उपलब्ध असतील. तसेच, सर्व मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया थेट प्रक्षेपित केली जाईल, अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगाने दिली.


एका बाजूला सत्तेत राहण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत असताना, दुसरीकडे ७.४२ कोटी मतदारांना शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात आपला कौल देता यावा, यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारे हे मतदान आणि त्यानंतर १४ तारखेला लागणारा निकाल बिहारच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहे.




  1. बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार

  2. विधानसभेच्या २४३ जागांसाठी मतदान होणार

  3. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार

  4. मतमोजणी आणि निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार

  5. बिहारमध्ये एकूण मतदार ७४.३ दशलक्ष

  6. बिहार : ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला मतदार तर १७२५ तृतीयपंथी मतदार

  7. बिहारमध्ये १८ ते १९ वयोगटातील १४.०१ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार


Comments
Add Comment

Sonam Wangchuk - J P Nadda : २३ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर संपले! जे. पी. नड्डांसोबत चर्चेनंतर मोठा निर्णय

नवी दिल्ली : तब्बल २३ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारणा चळवळीचे प्रमुख

Ramayana Part 1 Trailer : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर रिलीज होण्याआधीच लीक; निर्मात्यांनी उचलले 'हे' कठोर पाऊल!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत असलेल्या 'रामायण: पार्ट १' (Ramayana Part 1) या चित्रपटाची

Kangana Ranaut on CJP : "आमचं सरकार जनतेने निवडलंय, कसं चालवायचं ते आम्ही ठरवू"; सीजेपीच्या आंदोलनावर कंगना राणौतची कडाडून टीका

नवी दिल्ली : बॉलीवूडची 'क्वीन' (bollywood Queen) आणि विद्यमान लोकसभा खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) हिने आज संसदेच्या पावसाळी

Tripura DGP Anurag Dhankar : त्रिपुरा पोलीस दलात मोठी खळबळ; राज्याचे पोलीस महासंचालक अनुराग धनकर यांचा कार्यालयातच आढळला मृतदेह

आगरतळा : सोमवारचा दिवस त्रिपुरा राज्यासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणजेच

Mumbai News : मोठी बातमी! मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

नवी दिल्ली : 'नीट' (NEET) परीक्षेचा मुद्दा आणि रोजगाराच्या प्रश्नावर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व

Dharmendra Pradhan Met Amit Shah : दिल्लीतल्या हालचालींना वेग! धर्मेंद्र प्रधान गृहमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले, पदाचा राजीनामा देणार?

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला.