Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने आपल्या पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घातला आहे. उत्तर प्रदेश विरुद्ध आंध्र (Uttar Pradesh vs Andhra) या सामन्यात, आंध्रच्या संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४७० धावांचा मोठा डोंगर उभारला. या आव्हानात्मक धावसंख्येसमोर उत्तर प्रदेश (UP) संघाची सुरुवात खराब झाली, आणि संघ अडचणीत सापडला. नेमक्या अशा कठीण परिस्थितीत रिंकू सिंग मैदानात आला आणि त्याने वादळी खेळी करत दमदार शतक झळकावले. रिंकू सिंगने सहकारी फलंदाज विपराज निगम याच्यासोबत महत्त्वाची शतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे उत्तर प्रदेशचा संघ पुन्हा एकदा सामन्यात जोरदार पुनरागमन करू शकला. रिंकू सिंगची ही खेळी उत्तर प्रदेशसाठी संजीवनी ठरली आहे.



रिंकू सिंगचे रणजीमध्ये फर्स्ट क्लास आठवे दमदार शतक


कर्णधार करण शर्मा बाद झाल्यानंतर, रिंकू सिंग (Rinku Singh) मैदानात उतरला, त्यावेळी उत्तर प्रदेश (UP) संघाची धावसंख्या १४६/३ अशी होती. यानंतर लगेचच आर्यन जुयाल (६६) आणि भारताच्या अंडर-१९ संघाचा माजी कर्णधार प्रियम गर्ग (१८) हे महत्त्वाचे फलंदाजही पॅव्हेलियनमध्ये परतले. १७८ धावांवर यूपीची अर्धी टीम माघारी परतल्याने संघ मोठ्या संकटात सापडला होता. अशा परिस्थितीत रिंकूने प्रथम अराध्य यादवसोबत (१७) सहाव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अराध्य बाद झाल्यानंतर रिंकूला आयपीएल स्टार विपराज निगमची चांगली साथ मिळाली.


शुक्रवारच्या (तिसऱ्या दिवसाच्या) अखेरीस या दोघांनी मिळून संघाचा स्कोअर ६ बाद २९४ पर्यंत पोहोचवला. त्यावेळी रिंकू ८२ धावांवर नाबाद होता, तर यूपी संघ आंध्रपेक्षा १७६ धावांनी मागे होता. आज (शनिवारी) रिंकूने आपला खेळ पुढे नेत, अत्यंत कठीण परिस्थितीत फर्स्ट क्लास कारकिर्दीतील आपले आठवे शतक पूर्ण केले. या शतकासाठी त्याने १८० चेंडू खेळले, ज्यात त्याने ९ चौकार आणि २ उत्तुंग षटकार झळकावले. रिंकू सिंगच्या या महत्त्वपूर्ण शतकी खेळीमुळे उत्तर प्रदेशचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे.



यूपीला आघाडी मिळेल का?


कानपूरमध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आंध्रने पहिल्या डावात उभारलेल्या ४७० धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येसमोर यूपीला आघाडी मिळवता येणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बातमी लिहेपर्यंत उत्तर प्रदेशचा स्कोअर ७ बाद ३५९ असा होता. यूपीचा संघ अजूनही आंध्रच्या धावसंख्येपेक्षा १११ धावांनी मागे आहे. रिंकू सिंगला चांगली साथ देणारा फलंदाज विपराज निगम (४२) धावा काढून बाद झाला आहे. सध्या रिंकू सिंग (Rinku Singh) ११८ धावांवर खेळत असून, त्याने एक बाजू यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्याला सध्या शिवम शर्मा याची साथ मिळत आहे. सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी असली तरी, पहिल्या डावात आघाडी (Lead) मिळवणे यूपी संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ही आघाडी मिळवण्याची सर्वी भिस्त आता रिंकू सिंग आणि अखेरच्या फळीतील फलंदाजांवर आहे.



रिंकू सिंग आता ऑस्ट्रेलियात 'धुमाकूळ' घालणार


टीम इंडियाचा सध्याचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याला आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सध्या तो रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या पहिल्या सामन्यात खेळत असला तरी, त्याच्यासाठी हा आगामी दौरा अत्यंत खास असणार आहे. रिंकू सिंगने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याचा हा ऑस्ट्रेलियातील पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये मात्र रिंकूचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत. या ५ सामन्यांमधील ४ डावांत त्याने ५२.५० च्या उत्कृष्ट सरासरीने १०५ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट तब्बल १७५.०० इतका दमदार आहे. रिंकू सिंगचा हा उत्कृष्ट टी-२० रेकॉर्ड पाहता, ऑस्ट्रेलियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात तो आपल्या फिनिशिंगच्या जोरावर टीम इंडियाला नक्कीच मोठा फायदा मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले