Saturday, October 18, 2025
Happy Diwali

मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त!  सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या सेवनामुळे अनेक लहान मुलं दगावल्याने देशभर खळबळ माजलेली आहे. असे असताना आता त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर एका मालगाडीतून सुमारे २ कोटी किमतीचे बंदी घातलेले खोकल्याचे सिरप जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता सुरू झालेल्या आणि शुक्रवारी पहाटे संपलेल्या शोध मोहिमेनंतर ही जप्ती करण्यात आली आहे. तर त्रिपुरा पोलिसांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या लढाईत एक मोठे यश मिळवत, सरकारी रेल्वे पोलिस दल, सीमाशुल्क विभाग आणि विशेष कार्य दल यांनी ही संयुक्त कारवाई केली."

याचबरोबर पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "संयुक्त छाप्यादरम्यान, पथकांनी पश्चिम त्रिपुरातील जिरानिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या दोन मालगाड्यांच्या वॅगनमधून बंदी घातलेल्या खोकल्याच्या सिरपच्या १०० मिलीच्या तब्बल ९० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत." याप्रकरणी अद्यापपर्यंत तरी कुणावरीही अटकेची कारवाई झालेली नव्हती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

भारतात मागील काही दिवसांत कफ सिरप घेतल्याने किडनी निकामी होवून किमान २२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता भारत सरकारने याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून, कोल्ड्रिफ, रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफ या तीन कफ सिरपना विषारी घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा