मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली. पिंपरीपाडा परिसरात पंजाब डेअरीजवळ असलेल्या लाकडी भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली आणि काही क्षणातच ही आग मोठ्या भागात पसरली. धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरल्याचे दिसत होते.


सदर गोदामात लाकडी प्लायवुड, फर्निचरचे तुकडे आणि इतर जळणारे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर ती प्रचंड वेगाने पसरली. काही क्षणांतच गोदामाच्या संपूर्ण परिसराने आगीचा वेढा घेतला. धुरामुळे आजूबाजूचा परिसरही झाकला गेला.


घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, आगीचा धूर इतका गडद होता की तो सुमारे एक किलोमीटर दूरवरूनही स्पष्टपणे दिसत होता. आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, विशेषतः ही वस्ती झोपडपट्टीजवळ असल्यामुळे आग झोपड्यांपर्यंत पोहोचेल का, याची भीती होती.


मुंबई अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या, मात्र पिंपरीपाडा परिसरातील अरुंद रस्ते आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे (ट्राफिक जॅम) अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. तरीदेखील, जवानांनी धाडसाने काम करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू केली.


या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. काहीजणांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आलं असून, कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.


सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू केलं आहे, जेणेकरून आग पुन्हा भडकू नये. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा लाकडी साहित्यामुळे झालेला घर्षणाद्वारे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत तपास अहवाल आल्यानंतरच या घटनेचं मूळ कारण समोर येईल.


मुंबईसारख्या महानगरामध्ये अरुंद रस्ते, बिनधास्त साठवलेलं ज्वलनशील साहित्य आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत.

Comments
Add Comment

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली