Explainer: मुहूरत ट्रेडिंग म्हणजे काय? त्याचा नक्की आध्यात्म-अर्थशास्त्राशी काय संबंध? यावर्षी काय बदल सगळच जाणून घ्या

मोहित सोमण


मुहुरत (मराठीत मुहूर्त) ट्रेडिंग म्हणजे शुभलक्षण व्यापारी सत्र. शेअर बाजारात 'लक' ला खूपच मोठे महत्व असत. कधीकधी फंडामेंटल टेक्निकल विश्लेषणानंतरही शेअर बाजारात नफा अथवा तोटा याची शाश्वती नसते. अशावेळी लक (नशीब) महत्वाचं ठरत. शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्यानंतर येणारे वर्ष आर्थिक दृष्ट्या सक्षम व फायदेकारी ठरेल अशी एक सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये समजूत आहे. विशेषतः हिंदू कालनिर्णयानुसार या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला विशेष महत्व आहे. यावेळी व्यापारांचे 'गुड लक' मानले जाते. त्यामुळे शेअर बाजाराच्या या विशेष सत्रात लक्ष्मीपूजनाप्रमाणे विशेष वेळी ट्रेडिंग केल्यास त्यानंतर चांगला परतावा भविष्यात लक्ष्मी आशीर्वादाने मिळेल अशी समजूत आहे नव्हे ती तर परंपरा आहे. अगदी शेअर बाजारात १९५७ व एनएसईत १९९२ पासून मुहुरत ट्रेडिंग सुरु असते.


हिंदू धर्मशास्त्रात आध्यात्म, अर्थकारण हे एकमेकांवर अवलंबून आहे. श्रद्धा, भक्ती, सामर्थ्य, दृष्टीकोन, कर्म, नशीब यांचे मिश्रण म्हणजे अध्यात्म शास्त्र होय. यासाठीच मुहूरत ट्रेडिंग अंतर्गत नव्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात गुंतवणूकदार पदार्पण करतात. गुज राती मारवाडी समाजाच्या संस्कृतीत याला समवात (Samvat) देखील म्हटले जाते.


एकूण बाजारातील भावना प्रतिबिंबित करण्याव्यतिरिक्त देशाच्या अर्थकारणावर सांस्कृतिक मूल्यांचा किती पगडा आहे हे ते दर्शवते. अनुभवी गुंतवणूकदारांसाठी, ही दीर्घकालीन त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याची संधी आहे जे नुकतेच गुंतवणूक करण्यास सुरु वात करत आहेत त्यांच्यासाठी देखील हा एक चांगला काळ मानला जातो.


सामान्य ट्रेडिंग दिवसांपेक्षा, मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी फक्त एक तासासाठी खुले असते. या कालावधीत प्री-ओपन सेशन, सामान्य ट्रेडिंग सेशन आणि क्लोजिंग सेशन सामान्यतः होतात. प्रत्यक्ष ट्रेडिंगच्या काही दिवस आधी, एक्सचेंज सामान्यतः बाजाराच्या वेळा जा हीर करतात.


यावर्षी मुहुरत ट्रेडिंग दुपारी १.४५ ते २.४५ वाजता होणार आहे. एक्सचेंजेसवरील परिपत्रकानुसार, मुहूर्त ट्रेडिंग २१ ऑक्टोबर, मंगळवार रोजी होणार आहे, सोमवार २० ऑक्टोबर रोजी नाही असे अधिकृत माहिती सांगते. या दिवशी भारतीय शेअर बाजार एक ता साच्या ट्रेडिंग सत्राशिवाय बंद राहील. यावर्षी भारत सोमवार २० ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणार असला तरी भारतीय शेअर बाजारासाठी टोकन मार्केट ट्रेडिंग सत्र त्याच दिवशी होणार नाही. खरं तर, दलाल स्ट्रीट सोमवारी सामान्य ट्रेडिंग तासांसाठी, म्हण जे सकाळी ९ ते दुपारी ३.३० पर्यंत खुले राहणार आहे. फक्त मंगळवारीच एका तासाचे शुभ मुहूर्त ट्रेडिंग सत्र होईल.


ट्रेंडपासून वेगळे होऊन या वर्षीचे मुहूर्त ट्रेडिंग सत्र दुपारी १.४५ ते दुपारी २.४५ पर्यंत होईल. साधारणपणे, विशेष सत्र संध्याकाळी आयोजित केले जाते. यंदा वेळ बदलली गेली आहे. परिपत्रकानुसार, १५ मिनिटांचा प्री-ओपन सत्र दुपारी १.३० ते १.४५ पर्यंत असेल, तर सामान्य व्यवहार दुपारी १.४५ पासून सुरू होईल.


गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्रादरम्यान केलेल्या सर्व व्यवहारांमुळे सेटलमेंट बंधने लागू होणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले गेले आहे. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी दिवाळी बंद राहण्याव्यतिरिक्त, मुहूर्त ट्रेडिंग सत्र वगळता भा रतीय स्टॉक एक्सचेंज बुधवार २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त सुट्टीवर जातील.


गेल्या पाच मुहूर्त ट्रेडिंग सत्रांमध्ये (२०२०-२०२४) निफ्टी ५० सातत्याने सकारात्मक क्षेत्रात बंद झाला आहे, प्रत्येक वेळी ०.४०% ते ०.९०% च्या श्रेणीत परतावा देत असल्याचे तज्ञांचे मत आहे. या वर्षी देखील सहाय्यक तांत्रिक निर्देशक आणि सुधारित मूलभूत तत्त्वां च्या मिश्रणामुळे, एकूण बाजारातील भावना आशावादी राहिली आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी ५० साठी व्यापक दृष्टिकोन रचनात्मक राहतो आणि "बाय-ऑन-डिप्स" धोरण प्रबळ राहण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञ सांगतात.

Comments
Add Comment

सणासुदीच्या बाजारात ७ लाख कोटींची ऐतिहासिक खरेदी; मोदींच्या जीएसटी कपातीचा 'जादुई' प्रभाव!

महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी दर कपातीच्या

Bangladesh News : ढाका विमानतळात भीषण आग! विमानतळाचे कार्गो क्षेत्र आगीच्या विळख्यात; धुरामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. ढाका येथील हजरत शाहजलाल

IDBI Q2Results: आयडीबीआय बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल ९८% वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण:आयडीबीआय या आघाडीच्या खाजगी बँकेने इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ९८% वाढ नोंदवली आहे. प्रामुख्याने

ICICI Bank Q2Results: देशातील क्रमांक दोन खाजगी बँकेचा तिमाही निकाल जाहीर विश्लेषकांचा भाकीताला मागे टाकत बँकेच्या निव्वळ नफ्यात ५.२% वाढ

मोहित सोमण: देशातील क्रमांक दोन खाजगी बँक म्हणून ओळख असलेल्या आयसीआयसीआय बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे.

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

HDFC Bank Q2 Results: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा निकाल जाहीर HDFC Bank निव्वळ नफ्यात थेट १०.८% वाढ

मोहित सोमण:देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचडीएफसी बँकेने आपला आर्थिक निकाल जाहीर केला