दिवाळीत फटाके फोडताना काळजी घ्या, हात भाजल्यावर काय कराल?

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा पर्व. या सणात प्रत्येक घर झगमगून जाते, अंगणात सुंदर रांगोळ्या सजतात, आकाशात रंगीबेरंगी कंदील लुकलुकतात आणि मुलं-मुली किल्ले बांधण्यात व्यस्थ असतात. पण दिवाळी म्हटलं की फटाके फोडल्याशिवाय सण अपूर्णच वाटतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फटाके फोडायला आवडतात. पण, या आनंदात थोडीशी बेपर्वाई झाली, तर अपघात होऊ शकतो. आणि त्याची ठिणगी तुमच्या शरीराच्या अवयवावर पडू शकते. फटाके फोडताना शरीर भाजलं.. तर या गोष्टी तातडीनं करायला अजिबात विसरू नका.



दिवाळीत हात भाजल्यावर काय कराल?


1) थंड पाणी


शरीराचं जे भाग जळलं आहे, ते थंड पाण्याच्या खाली ठेवा. किमान 10-15 मिनिटांपर्यंत असं करत राहा. यामुळे शरीराला वेदना कमी होतील आणि फोड येण्याचा धोकाही कमी होतो. परंतु बर्फाचं पाणी किंवा बर्फ भाजलेल्या जागेवर लगेच लावू नये. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकतो.



2) कपडे आणि दागिने लगेच काढून टाका


जळलेल्या शरीराच्या भागावर जर एखादी अंगठी, बांगड्या किंवा टाईट कपडा असेल, तर ते लगेच काढून टाकावे. कारण शरीर जळाल्यानंतर सूज येऊ शकते. यामुळे शरीराला जखम किंवा वेदना होऊ शकतात.



3) जळलेल्या भागाला खाजवू नका


शरीराच्या ज्या भागाला भाजलं असेल, त्या जागेवर हातने खाजवू नये. यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो आणि त्वचा रोगही होण्याची शक्यता असते. त्वचेची जखम मोठी होऊ शकते.



काय करू नका?


1) टूथपेस्ट किंवा हळद लावू नका


हे घरगुती उपाय अनेकदा शरीरासाठी घातक ठरू शकतात. यामुळे परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. यामध्ये असे तत्व असतात, ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्वचा खराब होऊ शकते.



2) थेट बर्फ लावू नका


शरीराच्या ज्या भागात जळलं असेल, त्या ठिकाणी लगेच बर्फ लावू नये. त्यामुळे फ्रोस्टबाईटचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे त्वचेचं आणखी नुकसान होऊ शकतं. तसच त्वचेवर फोड आल्यास ते फोडू नका. यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं.



First Aid नंतर काय करू नका?


थंड पाण्याने दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही शरीराचं जळलेल्या भागावर एंटीसेप्टिक क्रीम लावू शकता. जसं की सिल्व्हर सल्फेडियाजीन क्रीम, सामान्यपणे ही क्रीम जळलेल्या भागावर लावतात. जळलेलं भाग एखाद्या साफ कपड्याने किंवा पट्टीने झाकून ठेवा. जेणेकरून त्वचेला इन्फेक्शन होणार नाही. पट्टी खूप टाईट बांधा.

Comments
Add Comment

सफरचंद खाण्याची योग्य पद्धत, सालासकट की साल काढून?

सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात, कारण त्यात भरपूर

Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने

आज धनत्रयोदशी, लक्ष्मी-कुबेर पूजनासाठी सर्वोत्तम मुहूर्त 'हे' दोन तास अत्यंत महत्वाचे

अश्विन कृष्ण त्रयोदशी किंवा धनत्रयोदशी आज साजरी होत आहे. पंचांगानुसार, त्रयोदशी दुपारी १२:१८ वाजता सुरू होईल आणि

फॅटी लिव्हरची धोकादायक कारणं उघड! सुटका हवीय? जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत

फॅटी लिव्हर: बदलत्या जीवनशैलीनुसार फॅटी लिव्हर ही समस्या सामान्य पण गंभीर होत चालली आहे. या आदाराची स्पष्ट

वसुबारस २०२५; तिथी, पूजा विधी, कालावधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

हिंदू धर्मातील वसुबारस या सणाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या विविध भागांत हा सण

जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कोणती खरेदी तुम्हाला यंदा भरभराटीचे दरवाजे उघडून देईल...

मुंबई : भारतीय परंपरेनुसार दिवाळीचा शुभारंभ धनत्रयोदशी या विशेष दिवशी होतो. यावर्षी हा दिवस शनिवार, १८ ऑक्टोबर