कॅनबेरा : भारतीय वेळेनुसार रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेड आणि अक्षर पटेल यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड याला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे भविष्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ट्रॅव्हिस हेडचा म्हणलं कि, विराट आणि रोहित 2027 विश्वचषकापर्यंत नक्की खेळतील आणि बाजूला उभा असलेला अक्षर पटेल हसून गेला.
पर्थमध्ये शुक्रवार रोजी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रॅव्हिस हेड आणि अक्षर पटेल एकत्र होते.हेडला जेव्हा विराट आणि रोहितच्या भविष्यावर विचारलं, तेव्हा त्याने उत्तर दिलं “ते दोघंही भारतासाठी जबरदस्त खेळले आहेत. मला वाटतं अक्षर त्यांच्याबद्दल अधिक चांगलं सांगू शकेल, पण हे दोन खेळाडू पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ आहेत.विराट कदाचित व्हाईट-बॉल क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू आहे, आणि रोहित त्याच्या फार मागे नाही.”
हेड पुढे म्हणाला “सलामीवीर म्हणून रोहितने जे काही केलं, त्याबद्दल मला खूप आदर आहे. कधीतरी त्यांची कमतरता नक्कीच जाणवेल. पण मला वाटतं ते दोघंही 2027 पर्यंत खेळतील.”हे बोलताच त्याने अक्षरकडे पाहिलं आणि अक्षर हसला. त्यावर हेड म्हणाला, “ते दोघंही प्रयत्न करत आहेत की 2027 विश्वचषकापर्यंत खेळावं. हे खेळासाठी चांगलं आहे की ते अजूनही खेळत आहेत.”
भारतीय अष्टपैलू अक्षर पटेलनेही विराट आणि रोहितबद्दल बोलताना सांगितलं की, “ते दोघंही व्यावसायिक खेळाडू आहेत, त्यांना काय करावं लागेल हे माहित आहे. ते सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.” अक्षर म्हणाला ,“जर तुम्ही त्यांच्या फॉर्मबद्दल विचार करत असाल, तर ते चांगली तयारी करत आहेत. सर्वांनी आपले फिटनेस टेस्ट दिले आहेत, आणि आता ते खेळण्यासाठी पूर्ण तयार आहेत.”