राष्ट्रीय महामार्गावर ‘राजमार्गयात्रा’अॅप सोयीस्कर

मुंबई  : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासादरम्यान पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र किंवा हॉस्पिटल कुठे आहे, हे शोधण्यासाठी आता वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार नाही. केंद्र सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी ‘राजमार्गयात्रा’ नावाचे नवे मोबाईल ॲप विकसित केले आले आहे. याअॅपमुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हे ॲप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) विकसित केले आहे.


या ॲपमध्ये आधुनिक जीपीएस-आधारित प्रणाली वापरली आहे. या प्रणालीमुळे प्रवासी आपल्या सध्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या सर्व सुविधांची माहिती नकाशावर सहज पाहू शकतात. या ॲपच्या मदतीने, प्रवाशांना पेट्रोल पंप, टोल प्लाझा, विश्रांती केंद्र, खाद्यपदार्थ स्टॉल, हॉस्पिटल, पार्किंग क्षेत्र आणि फर्स्ट एड सेंटर यांची माहिती अगदी अचूकपणे मिळते. प्रवासादरम्यान अचानक एखादी अडचण आली, अपघात झाला किंवा रस्त्यावर कुठे मोठा अडथळा निर्माण झाला, तर अॅपवरून ‘हायवे हेल्पलाइन’वर तक्रार नोंदवू शकतात. ॲपमध्ये थेट तक्रार नोंदवण्याची सोय असल्याने, प्रशासनाला नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करता येते. यामुळे महामार्गावर प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळबचतीचा होण्यासाठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका