रुग्णांच्या आहाराची आता महापालिका घेणार अतिविशेष काळजी

दहा उपनगरीय रुग्णालयामध्ये आहार पुरवण्यासाठी मागवल्या निविदा


आहार तज्ञांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रुग्णांना पौष्टिक आणि सकस आहारावर भर


मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या आरोग्या बरोबरच आहाराची काळजी घेतली जाते. रुग्णांच्या आहारात दुपार आणि रात्रीच्या जेवण तसेच सकाळ ची न्याहारी आदींची व्यवस्था ही रुग्णालय व्यवस्थापनाच्या माध्यमातून करण्यात येत असते. मात्र रुग्णांच्या आरोग्याची आता विशेष काळजी घेत आहार तज्ञांनी बनवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रुग्णांना आहार आणि देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने आता सुरुवात केली आहे.


महापालिकेच्या दहा रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या आहारासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या या मार्गदर्शक तत्त्वानुसारच जेवण आणि नाश्ता पुरवण्याचा विचार केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून आता महापालिका आरोग्य विभागाने दहा उपनगरीय रुग्णालयासाठी निविदा मागवल्या आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक पौष्टिक आणि सकस आहारावर आता महापालिका आरोग्य विभाग अधिक भर देणार आहे.


मुंबई महापालिकेच्या दहा रुग्णालयांतील रुग्णांना पौष्टिक, नियोजित आणि त्यांच्या आजारानुसार विशेष आहार मिळावा, यासाठी पालिकेने ‘शिजवलेल्या आहार पुरवठ्या’च्या नव्या करारासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत मधुमेह (डायबेटिक), उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मीठविरहित (सॉल्ट फ्री), मीठमर्यादित (सॉल्ट रेस्ट्रिक्टेड) आणि आरटी फीड (नळीमार्गे दिला जाणारा द्रव आहार) या प्रकारच्या विशेष आहाराचा पुरवठा रुग्णांना होणार आहे. या माध्यमातून दररोज १६०० रुग्णांना नाष्टा, दुपारचे व संध्याकाळचे जेवण आणि चहा-बिस्कीट अशी सेवा पुरवली जाणार आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाच्या रुग्णसेवेसोबत चांगल्या दर्जाचा आणि पौष्टिक आहार मिळणार आहे.


या रुग्णालयांचा समावेश


एस. के. पाटील रुग्णालय (मालाड), एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय (मालाड), श्री हरिलाल भगवती रुग्णालय (बोरिवली), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (बोरिवली), दयाबेन मेहता (एमएए) रुग्णालय (चेंबूर), पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय (गोवंडी) , सावरकर रुग्णालय (मुलुंड), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (कांदिवली), राजावाडी रुग्णालय (घाटकोपर), कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालय (चिंचपोकळी).



असा असणार आहार...


सकाळचा नाष्टा : साखरविरहित चहा, उपमा/पोहे/रवा/शिरा/दलिया, इडली चटणी, फळ (केळी/मोसंबी/सफरचंद)


दुपार रात्रीचे जेवण : भात, चपाती, डाळ/सांबार/कढी, भाजी (मूळभाज्या मर्यादित), उसळ/पनीर/सोया, दही, सलाड, चटणी


मीठमुक्त/मीठ-नियंत्रित आहार : जास्त मीठ, सुद्धा कांदा-लसूण मिश्रण, मेवा, मीठकट पदार्थ वर्ज्य


लिक्विड/आरटी-फीड : ज्या रुग्णांना चावता/खाता येत नाही, त्यांना ब्लेंडरमध्ये मिक्स अन्न (भात, डाळ, भाज्या, दूध, तेल, फळे) ५०० मिली प्रमाणात देणे.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील