'सरकार कमावतंय, मग मी का नको? काय आहे हे शाहरुख खानचे प्रकरण, सविस्तर वाचा...

पानमसाल्याच्या जाहिरातींवर शाहरुख खानचे सडेतोड उत्तर


मुंबई:बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खान हा अभिनेता अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्यासोबत पानमसाल्याच्या जाहिराती केल्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होतो. अलीकडेच, युट्युबर ध्रुव राठी याने प्रचंड संपत्ती असूनही शाहरुख खान पानमसाला आणि धूम्रपानाच्या जाहिराती का करतो, असा थेट प्रश्न विचारत त्याला लक्ष्य केले होते.


या ट्रोलबाजीच्या पार्श्वभूमीवर, शाहरुख खानचा एका जुन्या मुलाखतीतील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात त्याने या प्रश्नावर अत्यंत सडेतोड उत्तर दिले आहे.


धूम्रपान आणि कोल्ड्रिंकच्या जाहिरातींवर बोलताना शाहरुख खान म्हणाला होता की, "मी त्यांच्या (उत्पादनांच्या) ऑथॉरिटीकडे तक्रार करू शकतो की, धूम्रपान आणि कोल्ड्रिंक जर जीवघेणे असतील, तर त्यांचे उत्पादन तातडीने बंद झाले पाहिजे. पण, ते बंद होत नाहीत याची कारणे काय असतील?"


यावर त्याने स्वतःच उत्तर देत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. जर सरकारला त्यांच्या उत्पादनातून (उत्पादन शुल्क, कर या माध्यमातून) पैसे मिळत असतील, तर मी त्याची जाहिरात करून पैसे का कमवू शकत नाही? सरकारला त्यातून पैसे मिळतात म्हणून याचे उत्पादन सरकार थांबवू शकत नाही आणि त्यामुळे माझंही उत्पन्न थांबवू नका. मी एक अभिनेता आहे. अभिनय करून पैसे कमवणे हे माझं काम आहे, असे उत्तर त्याने दिले.


शाहरुखने शेवटी अत्यंत साधे स्पष्टीकरण दिले, "खूप साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर हे चुकीचं वाटत असेल तर ते प्रॉडक्ट घेऊ नका."


शाहरुख खानच्या या जुन्या विधानाने सध्याच्या ट्रोलर्सला चोख उत्तर दिले असून, 'उत्पादन बंद करण्याची जबाबदारी सरकारची' आणि 'जाहिरात करणे हे अभिनेत्याचे काम' या दोन मुद्द्यांवर हा वाद पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे.

Comments
Add Comment

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र