ऑनलाइन जुगार, बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी संदर्भात सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीत केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली.

सेंटर फॉर अकाउंटेबिलिटी अँड सिस्टेमिक चेंज आणि शौर्य तिवारी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये देशभरात वेगाने पसरणाऱ्या ऑनलाइन जुगार आणि बेटिंग ॲप्सवर कठोर कारवाई करण्याची सरकारला विनंती करण्यात आली आहे.

उपरोक्त याचिकेवर आज, शुक्रवारी न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात म्हटले की, ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्म हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी वकिलाला याचिकेची प्रत द्या. ते त्यात लक्ष घालतील आणि नंतर पुढील सुनावणीत आपलं मत मांडतील.

भारतातील सुमारे ६५० दशलक्ष लोक ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. बहुतेक लोक रिअल मनी गेमवर पैज लावतात, ज्यांची वार्षिक उलाढाल ₹१.८ ट्रिलियन पेक्षा जास्त आहे.

Comments
Add Comment

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि