Rays Power Infra Limited कंपनीकडून ११५० कोटी आयपीओसाठी सेबीकडे DHRP अर्ज दाखल वाचा क्विक अपडेट 'प्रहार' वर 

मोहित सोमण:रेज पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (RAYS Power Infra Limited) कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी डीएचआरपी (Draft Red Herring Prospectus DHRP) फाईलिंग करत प्रस्तावित आयपीओसाठी अर्ज केला आहे. एक्सचेंज फायलिंगम ध्ये दिलेल्या माहितीनुसार, ११५० कोटींचा एकूण आयपीओ ऑफरिंगसाठी असू शकतो. यापैकी २ रूपये दर्शनी मूल्याप्रमाणे (Face Value) ९०० दशलक्ष निधी फ्रेश इश्यूमार्फत उभारला जाऊ शकतो. तर उर्वरित २ रूपये दर्शनी मूल्याप्रमाणे २५०० दशलक्ष बँक ऑफर फॉर सेल (OFS) साठी असू शकतात अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. बीएसई व एनएसईवर हा शेअर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. आनंद राठी इन्व्हेसमेंट लिमिटेड, व पँटोमॅथ कॅपिटल अँडव्हायजर प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहेत तर बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संबंधित खर्चासाठी, निव्वळ खर्चासाठी, आपली उपकंपनी रेज ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्री फायनान्सिंग करण्यासाठी, नर्मदापुरम मध्यप्रदेश येथे नवा प्रकल्प उभारणीसाठी, खेळत्या भांडवलासाठी (W orking Capital Requirements), दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे असे कंपनीने आपल्या डीएचआरपीत स्पष्ट केले आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात आर्थिक वर्ष २०२४ मधील १०४८७.९९ कोटींच्या तु लनेत वाढ होत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १२२०६.४१ कोटींवर पोहोचले आहे. तसेच कंपनीच्या इतर उत्पन्नात मागील वर्षाच्या मार्च तिमाहीतील २३७.०७ कोटींच्या तुलनेत या मार्च महिन्यात १७४.९० कोटी मिळाल्याने इतर उत्पन्नात घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आ हे. कंपनीच्या एकूण खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर घसरण झाली. गेल्या वर्षीच्या ९५५०.०५ कोटींच्या तुलनेत यंदा खर्च १०५१४.३५ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा पीबीटी (Profit before tax) गेल्या वर्षीच्या ११७५.०१ कोटींच्या तुलनेत वाढत यंदा १८६ ६.७३ कोटींवर पोहोचला होता. तसेच कंपनीचा ईपीएस (Earning per share) गेल्या वर्षीच्या ३.६१ तुलनेत ४.९६ वर वाढला आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात देखील इयर ऑन इयर बेसिसवर २२८.९४ कोटींवरून ६९६.१८ कोटींवर वाढला.


केतन मेहता, पवन कुमार शर्मा, संजय गरूडापल्ली, श्वेता मेहता, रिचा शर्मा, श्रुथी गुप्ता गरूडापल्ली, मेहता फॅमिली ट्रस्ट, शर्मा फॅमिली ट्रस्ट, गरूडापल्ली फॅमिली ट्रस्ट हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.


कंपनी सौर ऊर्जा सोलूशन कंपनी आहे. कंपनी एंड टू एंड उर्जा सोलूशनसह अक्षय उर्जा निर्मितीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करते ज्यामध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प विकासकांसाठी 'तयार-तयार' पायाभूत सुविधा तयार करणे समाविष्ट आहे.  जमीन एकत्रीकरण, ग्रि ड कनेक्टिव्हिटी सुरक्षित करणे (कदाचित आंतर-राज्य आणि राज्यांतर्गत दोन्ही) आणि कनेक्टिव्हिटी परवानग्या, बे वाटप, कॅप्टिव्ह व्यवस्था आणि वीज खरेदी करार (PPA) ज्याला एकत्रितपणे "सौर ऊर्जा मालमत्ता" म्हणून ओळखले जाते अशी सेवा व उत्पादने कंपनी पुरवते. ३१ जुलै २०२५ पर्यंत मॉडेल अंतर्गत कंपनीने कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह भारतातील ६ राज्यांमध्ये ८२४.०३ मेगावॅट प्रति तास क्षमतेचे ३६ सौर प्रकल्प सुरू केले आहेत. ३१ जुलै २०२५ पर्यंत  भारता तील ७ राज्यांमध्ये ९४७.१५ मेगावॅट क्षमतेचे १४ सौरऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत ज्यात कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश आणि बांगलादेश आणि व्हिएतनाममधील दोन आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचा समावेश आहे.


कंपनी आणत असलेल्या आयपीओपैकी ५०% गुंतवणूक वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), १५% वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ३५% वाटा, व कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी ५% वाटा उपलब्ध असणार आहे अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे ३ क्रिकेटपटू ठार; अफगाण क्रिकेटसाठी काळा दिवस! अफगाण क्रिकेट बोर्डाचा ठाम निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये सीमा भागात तणावाचं वातावरण

काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर! मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता पक्षांतराला ही वेग

रुग्णांच्या आहाराची आता महापालिका घेणार अतिविशेष काळजी

दहा उपनगरीय रुग्णालयामध्ये आहार पुरवण्यासाठी मागवल्या निविदा आहार तज्ञांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच

दिवाळीपूर्वीच कोस्टल रोडच्या लगतची जळमटे केली साफ!

वरळीतील 'त्या' वाडीतील १६९ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त मुंबई (खास प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल

ईस्टर्न फ्रीवेसाठी मुंबईतील ३२० झाडे तोडणार!

मुंबई : घाटकोपर आणि ठाणे दरम्यानच्या ईस्टर्न फ्रीवे (महामार्ग) विस्ताराच्या कामाला मुंबई महापालिकेच्या (BMC)