कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

मुंबई : कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली.


मंत्री नितेश राणे म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईत कॅन्डेलाची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.



मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी ८ आणि पी १२ या अत्याधुनिक बोटींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात, त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी १२ बोट मुंबईत दाखल होणार असून, यामुळे राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.


या भेटीदरम्यान कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना आणि उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती मंत्री राणे यांना दिली. महाराष्ट्रात कॅन्डेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली.

Comments
Add Comment

रुग्णांच्या आहाराची आता महापालिका घेणार अतिविशेष काळजी

दहा उपनगरीय रुग्णालयामध्ये आहार पुरवण्यासाठी मागवल्या निविदा आहार तज्ञांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच

दिवाळीपूर्वीच कोस्टल रोडच्या लगतची जळमटे केली साफ!

वरळीतील 'त्या' वाडीतील १६९ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त मुंबई (खास प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती

महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ; माझगाव डॉक येथे दोन नौकांचे २७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे.

ईस्टर्न फ्रीवेसाठी मुंबईतील ३२० झाडे तोडणार!

मुंबई : घाटकोपर आणि ठाणे दरम्यानच्या ईस्टर्न फ्रीवे (महामार्ग) विस्ताराच्या कामाला मुंबई महापालिकेच्या (BMC)

दिवाळीच्या फटाक्यांमुळे तब्येतीला धोका!

मुंबई : दिवाळीमध्ये फटाक्यांची रोषणाई खूप छान दिसते, पण त्यामुळे हवेचे प्रदूषण खूप वाढले आहे. त्यामुळे

भायखळ्यातील ३५ बचत गटांना अशी झाली दिवाळीपूर्वी मदत

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावली निमित्त महिला बचत गटांनी बनवलेल्या फराळासह इतर वस्तूंच्या विक्रीसाठी मार्केट