फॅटी लिव्हरची धोकादायक कारणं उघड! सुटका हवीय? जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत

फॅटी लिव्हर: बदलत्या जीवनशैलीनुसार फॅटी लिव्हर ही समस्या सामान्य पण गंभीर होत चालली आहे. या आदाराची स्पष्ट लक्षणे लगेच दिसुन येत नाहीत, त्यामुळे बहुतांश वेळेस निदान होईपर्यंत यकृताचे नुकसान झालेले असते. यावर काही घरगुती उपाय त्याच प्रमाणे डाएटमध्ये थोडा बदल केल्यास समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. फॅटी लिव्हर म्हणजे यकृतात जास्त प्रमाणात चरबी जमा होणे. जेव्हा यकृताच्या एकूण वजनाच्या 5-10% पेक्षा जास्त चरबी जमा होते, तेव्हा याला फॅटी लिव्हर म्हणतात. यामुळे पचनशक्ती कमकुवत होते आणि शरीरावर इतर परिणाम होऊ शकतात.



फॅटी लिव्हर होण्यामागील कारणं


फॅटी लिव्हरची समस्या मुख्यतः जास्त प्रमाणात मद्यपान, लठ्ठपणा, तेलकट आणि फास्टफुडचे अधिक सेवन, मधुमेह, कमी व्यायाम, तास-न्-तास बसणे, काही औषधांचा जास्त वापर, मानसिक तणाव आणि अनियमित जीवनशैली यामुळे उद्भवते. आयुर्वेदानुसार, शरीरात चरबी वाढल्यास आणि अग्नी कमजोर झाल्यास यकृताच्या पेशी चरबी विघटित करण्यात अयशस्वी ठरतात, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते.



फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय


फॅटी लिव्हर ही समस्या आजकाल अनेक लोकांमध्ये दिसून येत आहे, पण योग्य घरगुती उपायांनी ती नियंत्रणात आणता येऊ शकते. यासाठी आवळ्याचा रस प्यायल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते, हळदीचे दूध यकृताची सूज कमी करते, त्रिफळ चूर्ण बद्धकोष्ठतेवर परिणाम करते आणि यकृत स्वच्छ ठेवते. तसेच कडुलिंब आणि गुळवेली शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात, तर पपई आणि लसूण यकृतावरील ताण कमी करून चरबी घटण्यास मदत करतात. या सर्व घरगुती उपायांचा नियमित वापर केल्यास फॅटी लिव्हरची समस्या प्रभावीपणे कमी करता येऊ शकते.



आरोग्यदायी जीवनशैली



  • जीवनशैलीमध्ये काही ठराविक बदल करणं आवश्यक आहे.

  • नियमित कमीत कमी 30 मिनिट चालण्याचा व्यायाम करावा, योग आणि प्राणायम करावे, मद्यपान-धूम्रपानापासून दूर राहा.

  • तेलकट आणि पाकिटबंद पदार्थ वर्ज्य करा.

  • डाएटमध्ये हिरव्या भाज्या, हंगामी फळं, अख्खे कडधान्य, डाळींचा समावेश करावा आणि पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.

  • गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.


आवळ्याचा रस कसा तयार करावा?



  • एक आवळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.

  • आवळ्याचे छोटे-छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासोबत वाटा.

  • हवे असल्यास त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करू शकता.


हळदीचे दूध कसे प्यावे?



  • ग्लासभर दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करा.

  • तुम्हाला हवे असल्यास दूध गरम किंवा थंड करून पिऊ शकता.

Comments
Add Comment

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

फेस स्टीम घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

फेस स्टीम किंवा चेहऱ्याला वाफ देण्याचे अनेक सौंदर्यदायी फायदे होतात . वाफ घेतल्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात,

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे

योग व्हावी जीवनशैली

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके जीवनशैली म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. जगण्याची ही पद्धत आपल्या आयुष्याचा अविभाज्य

करडईची भाजी

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे डिसेंबरची थंडी म्हणजे फक्त हवामानातला बदल नाही; ती आठवणींची चाहूल असते. सकाळी