डायट नाही, स्मार्ट डिनर : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक अनियमित आहार, लेट नाईट पार्ट्या आणि चुकीच्या खानपानाच्या सवयींमुळे वजनवाढीच्या समस्येला सामोरे जातात. सकाळचा आहार महत्त्वाचा मानला जातो, पण वजन कमी करायचं असल्यास रात्रीचा आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण दिवसाच्या शेवटी आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर, पचनावर आणि शरीरातील चरबीवर होतो.


जर रात्री हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा आहार घेतला, तर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. परंतु तेलकट, मसालेदार आणि जड अन्नामुळे वजन वाढते तसेच झोपेतही अडथळा येतो. म्हणूनच तज्ज्ञ रात्रीच्या जेवणात कमी कार्ब आणि जास्त प्रथिने व फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.



वजन कमी करण्यासाठी उपयुक्त रात्रीचे पदार्थ


नारळ भात
नारळाचा भात हलका, स्वादिष्ट आणि पचायला सोपा असतो. यात शेंगदाणे, काजू आणि मोहरी टाकून बनवल्यास तो अधिक पौष्टिक होतो. यात चरबीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे तो वजन कमी करण्यात मदत करतो.


ओट्स इडली
ओट्सपासून बनवलेली इडली ही कमी कार्ब आणि जास्त प्रथिने असलेली उत्तम रात्रीची डिश आहे. ओट्स इडली सांबार किंवा चटणीसोबत खाल्ल्यास चव आणि आरोग्य दोन्ही जपले जातात.


मटार उपमा
मटारयुक्त उपमा फक्त नाश्त्यासाठी नव्हे तर रात्रीच्या जेवणासाठीही उत्कृष्ट पर्याय आहे. यात व्हिटॅमिन C, K, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. गाजर, मिरची आणि कांदा घालून हा उपमा अधिक पौष्टिक बनतो.


मूग किंवा मसूर डाळ
हिरवे मूग, मसूर, टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा वापरून बनवलेली डाळ हलकी आणि पौष्टिक असते. यात प्रथिने, लोह आणि फायबर मिळते, ज्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.


हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी, चाकवत अशा पालेभाज्या रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उपयुक्त आहेत. या भाज्यांमध्ये फायबर जास्त असल्याने पचन सुधारते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.


भाज्यांचे किंवा डाळींचे सूप
वजन कमी करायचे असेल तर सूप हा उत्तम पर्याय आहे. मसूर सूप, मिक्स व्हेज सूप किंवा पालेभाज्यांचे सूप हलके, पचायला सोपे आणि पाण्याची कमतरता भरून काढणारे असते. हलक्या मसाल्यांमध्ये आणि थोड्या तुपात ते बनवले की चव वाढते आणि आरोग्यही सुधारते.


तज्ज्ञांचा सल्ला


रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन तास आधी घ्या.


साखर, तळलेले पदार्थ आणि जास्त मीठ टाळा.


जेवणानंतर हलकी फिरत चालणे (वॉक) करा.


पाणी योग्य प्रमाणात प्या, पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका.


रात्रीचे अन्न हे वजन कमी करण्यासाठी ‘शत्रू’ नाही, तर योग्य निवड केली तर ते तुमच्या फिटनेस प्रवासातील साथीदार ठरू शकते.

Comments
Add Comment

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी आहे? आजच आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा!

मुंबई : डेंग्यू किंवा इतर काही संसर्गजन्य आजारांमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे ही गंभीर बाब ठरू

आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस : नियमित हातांची स्वच्छता आवश्यक, आरोग्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी

वारंवार येणाऱ्या तापावर आयुर्वेदिक उपचार : गोकर्ण वनस्पतीचा काढा ठरतोय प्रभावी

मुंबई : सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना वारंवार सर्दी, खोकला, अंग दुखणे आणि ताप याचा त्रास होतो. पावसाळा,

कोलेस्टेरॉलचा वाढणारा धोका टाळा, शरीर आणि त्वचेवर होणारे बदल वेळीच ओळखा...

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सगळेच जण अरबटचरबट खात असतात. या सवयीमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत चालेल आहे.

ऑक्टोबरमध्ये जरूर खा या भाज्या, रहाल निरोगी आणि फिट

मुंबई: ऑक्टोबर महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्याने (मान्सून ते हिवाळा संक्रमण), या काळात रोगप्रतिकारशक्ती

हिवाळ्यातील सुपरफूड! तीळ खाल्ल्याने हृदय, हाडे आणि त्वचेला मिळतात फायदे. जाणून घ्या जबरदस्त फायदे

तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड