सहा देशांसाठी दीपिका पदुकोण बनली इंग्रजी व्हॉइस
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने मनोरंजन क्षेत्रापलीकडे जाऊन तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातही आपली जागतिक ओळख अधिक मजबूत केली आहे. दीपिकाने नुकतीच Meta AI साठी नवीन इंग्रजी व्हॉइस (English Voice) बनून Meta या बलाढ्य कंपनीसोबत भागीदारी केली आहे. दीपिकाने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली. भारत, युनायटेड स्टेट्स (US), कॅनडा, युनायटेड किंगडम (UK), ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा सहा प्रमुख इंग्रजी भाषिक प्रदेशांतील Meta AI वापरकर्त्यांना आता दीपिकाच्या आवाजात संवाद साधता येणार आहे.
याबद्दलचा उत्साह व्यक्त करताना दीपिका म्हणाली, "मला वाटतं, हे खूपच छान आहे! मी आता Meta AI चा भाग आहे आणि तुम्ही माझा आवाज वापरून इंग्रजीमध्ये माझ्याशी चॅट करू शकता. एकदा वापरून पाहा आणि तुम्हाला काय वाटतं, ते मला नक्की कळवा!" "Chat soon!" (लवकरच बोलू!) या तिच्या वाक्याने चाहत्यांना तिच्या नवीन डिजिटल अवताराशी संवाद साधण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्टॉकहोम : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरिटाइम वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने, महाराष्ट्राचे ...
Meta च्या संवादात्मक AI प्लॅटफॉर्ममध्ये (Conversational AI Platform) तिचा आवाज समाविष्ट करणारी ती मोजकी जागतिक व्यक्तींपैकी एक ठरली आहे. तिच्या या सहभागाने AI अनुभवाला एक मानवी आणि ओळखीचा स्पर्श मिळणार आहे, जो जगभरातील तिच्या लाखो चाहत्यांसाठी एक खास अनुभव असेल. Meta AI ची घोषणा करण्याच्या अवघ्या काही दिवस आधी, दीपिका पदुकोणने आणखी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सामाजिक जबाबदारीचा टप्पा गाठला आहे. १२ ऑक्टोबर रोजी दीपिका भारत सरकारची पहिली-वहिला मानसिक आरोग्य दूत (Mental Health Ambassador) बनली. स्वतः डिप्रेशनशी (Depression) दिलेल्या लढ्याचा अनुभव असल्याने, दीपिका सातत्याने मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवते. या सन्मानाबद्दल बोलताना ती म्हणाली, "माझ्या स्वतःच्या प्रवासातून मी शिकले की मदत घेणे हे दुर्बलतेचे नाही, तर ते सामर्थ्याचे लक्षण आहे."
कडबाम्स हॉस्पिटल्सच्या कार्यकारी संचालक नेहा कडबाम यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी या निवडीचे कौतुक केले आहे. भारतात नैराश्य आणि सामान्य दुःख यातील फरक समजावून सांगणे आणि 'कलंक' दूर करणे यासाठी दीपिकाचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सिनेमा, तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारी अशा तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी मोठी भूमिका बजावणारी दीपिका पदुकोण, आता जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारा एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी चेहरा बनली आहे, यात शंका नाही.