महाराष्ट्रात मतदार याद्या अपडेट करण्यासाठी SIR होणार ?


मुंबई : बिहारमध्ये मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने सखोल मतदार यादी तपासणी प्रक्रिया अर्थात Special Intensive Revision (SIR) राबवली. काँग्रेससह अनेक विरोधक सुरवातीला या एसआयआरला विरोध करत होते. पण नंतर त्यांचा विरोध मावळला. महाराष्ट्रात थोडं वेगळं चित्र आहे. महाराष्ट्रात अद्याप एसआयआर झालेले नाही. पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या प्रसंगी आधी मतदार यादी सुधारा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. सर्व विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या सूरात सूर मिसळले. यामुळे राज्यात मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोग लवकरच एसआयआर करण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांचा वापर करुन तयारी पूर्ण करावी यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी स्पष्ट भूमिका राज्यातील सत्ताधारी महायुतीने घेतली आहे. आता महायुती आणि विरोधक दोघांचे एकमत असल्यामुळे निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रात एसआयआर करण्याची शक्यता आहे.


याआधी मंगळवारी राज ठाकरे यांनी मतदार यादीत काही ठिकाणी नोंदी करताना चुका झाल्याचे सांगितले आणि उदाहरण पण दिले. एके ठिकाणी मतदार यादीमध्ये वडिलांपेक्षा मुलाचे वय जास्त दाखवण्यात आले आहे. हा मतदार यादीतील घोळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. यामुळे आधी मतदार यादी सुधारा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी राज ठाकरेंसह सर्व विरोधकांनी घेतली. सोमवारी विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली तर मंगळवारी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दोन्ही प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदार यादीच्या सुधारणेसाठी आग्रह धरला. यामुळेच राज्यात एसआयआर लवकरच राबवले जाण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

भेल कंपनीकडून गुड न्यूज तरीही थेट १०% शेअर कोसळला

मोहित सोमण: काही ब्रोकरेज कंपन्यांनी सरकारी मालकीची भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) कंपनीच्या शेअर्समध्ये

AMFI म्युच्युअल फंड वार्षिक अहवाल: एक वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणूक २३.११% वाढत ६५.७४ लाख कोटीवर क्लोज एंडेड योजनेला मात्र नापसंती

मोहित सोमण: एएमएफआय (Association of Mutual Fund of India AMFI) संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता (Asset Under Management

करप्ट लोकांची स्क्रिप्टेड मुलाखत, वाघासमोर ‘टॉम अँड जेरी’चा केविलवाणा प्रयत्न!” - शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघाती आरोप

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी विरोधकांच्या तथाकथित मुलाखतीवर जोरदार टीका करत, ती

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली

आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

प्रतिनिधी: आज गुंतवणूकदारांना कुठले शेअर लघू व मध्यम कालीन फायदेशीर ठरतील यावर मोतीलाल ओसवाल फायनांशियल

बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा