म.रे.च्या स्टेशन्सवर १६ ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद

मुंबई (प्रतिनिधी): दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर १६ ते २८ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लो.टि.ट., ठाणे, कल्याण, पनवेल या स्टेशन्सवर ही बंदी असणार आहे. रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुले आणि मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाश्यांना प्लॅटफॉर्म तिकीट जारी केले नाईल, प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवासाचे त्यानुसार नियोजन करावे असे म.रे.तर्फे सांगण्यात आले आहे.

डोंबिवली स्थानकात पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष ब्लॉक

मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात १२ मीटर रुंद पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डर लॉचिंगसाठी अप आणि डाउन जलद मार्ग तसेच ५ वा आणि ६ वा मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक १५ व १६ ऑक्टोबर च्या रात्री ००.२० ते ३.२० वाजेपर्यंत ३ तास तर डाउन आणि अप जलद मार्गावर : १.२० ते ३.२० वाजेपर्यंत तास घेतला जाईल असे म.रे. कडून सांगण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व