महापालिकेच्या ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी, गुरुवार १६ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू


मुंबई (खास प्रतिनिधी) : विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून गुरुवारी १६ ऑक्टोबर २०२५ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन लॉटरी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात अत्यल्प आणि अल्प गटासाठी या सदनिका उपलब्ध असतील.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ च्या विनियम १५ व ३३ (२०) (ब) अन्वये प्राप्त ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज मागविण्यात येत आहेत. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ऑनलाइन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होईल. अर्जदारांना १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. तर, अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम १४ नोव्हेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल आणि सोडत प्रक्रिया २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडेल. या सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.


या सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिका १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल. प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रकारची माहिती तसेच अटी व शर्तींबाबत पुस्तिकेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेतील सदनिकांसंदर्भात आवश्यक बदल करण्याचा अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आहेत. तसेच, माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती (वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांसह) लागू राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.


दरम्यान, या सोडतीसंदर्भात माहिती व मदतीसाठी ०२२-२२७५४५५३ या मदतसेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. अथवा, ‘सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई ४०० ००१’ या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.


Comments

Urmila Vishal Patil    October 23, 2025 07:34 AM

Need Home

Add Comment

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू