आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस : नियमित हातांची स्वच्छता आवश्यक, आरोग्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी सुधारण्यासाठी प्रेरित आणि एकत्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हात धुण्याची मोहीम राबवली जात आहे .


जगभरातील लोकांना रोग आणि संसर्ग टाळण्यासाठी साबणाने हात धुण्याचे महत्त्व पटवून देणे हा त्याचा उद्देश आहे. रोग प्रतिबंधक म्हणून साबणाने हात धुणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. जिवाणू , विषाणू , घाण , सूक्ष्मजीव आणि इतर संभाव्य हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी साबण किंवा हँडवॉश आणि पाण्याने हात स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे. धुतलेले हात वाळवणे हा प्रक्रियेचा एक भाग आहे कारण ओले हात अधिक सहजपणे पुन्हा दूषित होतात.


हात धुण्याचे फायदे – संसर्गाचा धोका कमी होतो - दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्यानंतर किंवा डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी हात धुतल्याने जिवाणू आणि विषाणू पसरण्यापासून रोखता येतात. रोगप्रतिकारशक्तीचे संरक्षण - हात स्वच्छ ठेवल्याने रोगप्रतिकारशक्तीवर जास्त ताण येत नाही आणि ती निरोगी राहते. स्वच्छता आणि आरोग्य - हात धुतल्याने माती, सूक्ष्मजीव आणि इतर अवांछित पदार्थ निघून जातात, ज्यामुळे एकूण आरोग्य चांगले राहते. सार्वजनिक आरोग्य सुधारते: शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नियमित हात धुण्याच्या सवयीमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार कमी होतो. आजार २५-५० टक्के कमी करता येतात. अनेक रोगांपासून बचाव - कोविड-१९, , सर्दी, श्वसन सिन्सिशिअल व्हायरस इन्फेक्शन, अतिसार,डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, हात पाय आणि तोंडाचा आजार,हिपॅटायटीस ए जंतांचा प्रादुर्भाव, प्रतिजैविक प्रतिकार,


हात कधी धुवावेत – जेवण बनवण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी, जेवण वाढण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर, शौचालयाला गेल्यानंतर, शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हात धुवावेत. बाळाचे नाक साफ केल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर.आजारी व्यक्तीला भेट दिल्यानंतर घरात पाळीव प्राणी असल्यास त्यांच्यासोबत खेळल्यानंतर हात अवश्य धुवावेत.


हात धुण्याची योग्य पद्धत - स्वच्छ, वाहत्या पाण्याने हात ओले करा.हातावर साबण लावा.हात चोळा (20 सेकंद):दोन्ही तळवे एकमेकांवर चोळा.एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या बोटांच्या मध्ये घासून घ्या.बोटांची मागील बाजू एकमेकांवर घासून घ्या.नखांच्या खाली आणि अंगठा व्यवस्थित चोळा.हे सर्व साधारण 20 सेकंदांपर्यंत करा.स्वच्छ, वाहत्या पाण्याखाली हात व्यवस्थित धुवा जेणेकरून साबण पूर्णपणे निघून जाईल.स्वच्छ टॉवेल किंवा पेपर टॉवेलने हात कोरडे करा.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर