२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद' शहराची शिफारस करण्यात आली आहे. 'राष्टकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने' अहमदाबादला प्रस्तावित यजमान शहर म्हणून निवडण्याची शिफारस केली आहे.


राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) अहमदाबादला २०३० च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी प्रस्तावित यजमान शहर म्हणून शिफारस केली. या शिफारसीवर अंतिम निर्णय २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येईल. हा निर्णय आता केवळ औपचारिकता मानला जात आहे.


यजमानपदासाठी भारतासमोर नायजेरियाची राजधानी अबुजा या शहराचे आव्हान होते. मात्र, कार्यकारी मंडळाने नायजेरियाला २०२६ किंवा त्यानंतरच्या स्पर्धांसाठी यजमानपदाची तयारी करण्यासाठी पाठिंबा देण्याची रणनीती आखली आहे.


जर अहमदाबादची निवड निश्चित झाली, तर भारतामध्ये तब्बल दोन दशकांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन होईल. यापूर्वी, भारताने २०१० मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते. २०३० राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळाल्यास, भारताच्या २०२६ ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनाच्या महत्त्वाकांक्षेला मोठे बळ मिळेल. ऑलिम्पिकसाठीही अहमदाबाद हेच प्रमुख शहर म्हणून प्रस्तावित आहे.


अहमदाबादमध्ये जागतिक दर्जाची क्रीडा स्टेडियम्स, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि एक उत्साही क्रीडा संस्कृती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरात 'सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह'चे बांधकाम सुरू असून, यात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम व्यतिरिक्त जलतरण केंद्र, फुटबॉल स्टेडियम आणि दोन इनडोअर अरेना यांचा समावेश आहे.


अहमदाबादमध्ये शताब्दी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करणे हा भारतासाठी एक 'असामान्य सन्मान' असेल. यामुळे भारताची जागतिक दर्जाची क्रीडा आणि कार्यक्रमांची क्षमता प्रदर्शित होईल आणि 'विकसित भारत २०२७' च्या राष्ट्रीय प्रवासात एक अर्थपूर्ण भूमिका बजावेल, अशी प्रतिक्रिया
पी.टी. उषा (अध्यक्ष, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन) यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन