म्युनिसिपल मुंबई संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापालिका मुख्यालयावर या मागणीसाठी धडकणार मोर्चा

मुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान अर्थात बोनस तसेच जुनी पेन्शन योजना, लाड पागे शिफारशीनुसार नोकऱ्या अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी महापालिका कर्मचाऱ्यांवर महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. म्युनिसिपल मुंबई संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे बोनससह कोणत्या मागण्या मान्य करत युनियन आपल्या पदरात काय पाडून घेते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.


म्युनिसिपल मुंबई संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर तसेच कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांनी या मोर्चाची हाक दिली असून महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना ५० हजार एवढे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कोरोनासारख्या महाभयंकर साथीमधील सेवा, कोल्हापूर, सांगली, महाड सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये धाऊन जाणारा म.न.पा. कामगार, तसेच ६० हजारांपेक्षा रिक्त पदे असतानाही मुंबईतील नागरिकांची इमाने-इतबारे अविरत देत असलेली सेवा तसेच त्यांनी बजावलेले कर्तव्य आणि वाढती महागाई हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगार व कर्मचारी या कायमच कर्मचाऱ्यांसह विविध खात्यातील कंत्राटी, रोजंदारी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरोग्य खात्यातील कंत्राटी कामगार, बालवाडी शिक्षिका व मदतनीस, अंशकालिक कर्मचारी, स्वच्छ मुंबई अभियान मधील कंत्राटी कामगार, सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी तसेच आरोग्य खात्यातील स्वयंसेवी आरोग्यसेविका यांना किमान ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिवाळी सणापूर्वी देण्यात यावा अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.


सानुग्रह अनुदानाच्या मागणीबरोबरच पी.टी. केस प्रकरणे, ५ मे २००८ नंतर महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले अशा कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बायोमॅट्रीक हजेरी प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींमुळे होत असलेल्या एएनएममुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसुल करण्याबाबतचे प्रसारित केलेले परिपत्रक स्थगित करण्यात यावे, वैद्यकिय गटविमा योजनेमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून सर्व कामगार कर्मचाऱ्यांना ५ लाख कॅशलेस विमा योजना कोणत्याही प्रकारच्या अटी-शर्ती व कॅपिंग न करता कायमस्वरूपी लागू करण्यात यावी. कामगार, कर्मचाऱ्यांची त्वरित भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी तसेच भरतीमध्ये कामगारांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात यावे, घ.क.व्य. खात्यातील कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावी आदी विविध मागणीकरीता म्युनिसिपल मुंबई संघटनेच्यावतीने बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. म.न.पा.तील सर्व कामग अधिकारी यांचा विशाल मोर्चा महापालिका मुख्यालयावर घेऊन जाणार असल्याची माहिती अशोक जाधव यांनी दिली.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ