महायुतीने केलेला विकास आणि उबाठाचा भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुद्दा

महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराची अशी ठरली रणनिती


मुंबई( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्यावतीने २२७ जागा लढून आम्ही १५० हून अधिक नगरसेवक निवडून आणले जातील असा विश्वास व्यक्त भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केला.तसेच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीने मुंबईत हाती घेतलेली आणि पूर्ण केेलेली विकासकामे तसेच मागील २५ वर्षांत शिवसेनेने महापालिकेत केलेला भ्रष्ट्राचार हाच प्रचाराचा मुद्दा असेल आणि याच मुद्यावर निवडणून लढवली जाईल असे स्पष्ट संकेतच साटम यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत पत्रकारांशी अनोपचारिक चर्चा करता भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईचा वचननामा हा जनतेच्या मनातील असून त्यादृष्टीकोनातून घरोघरी जावून याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या जात आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन तरुण इंटर्नची निवड करून ५० इंटरर्नशिप दिली जाईल.तसेच बेस्ट उपक्रमाचे सुसुत्रिकरण, महाालिका शाळा आणि रुग्णालयांच्या अंतर्गत कार्यपध्दतीत सुधारणा आदी प्रमुख कामांवर महायुतीचा फोकस असेल.

मुंबईतील प्रत्येक प्रभागांमध्ये भाजपाचा नगरसेवक कुठे निवडून येईल याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत तीन कोअर कमिटीच्या बैठका झाल्या असून त्यामध्ये आलेल्या माहितीनुसार प्रभागांमधील विकासकामांवर भर दिला जात आहे. आगामी निवडणुकीकरता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटप हे ज्या पक्षाचे प्राबल्य आणि निवडून येण्याची क्षमता यावरच असेल. मागील २५ वर्षांत महापालिकेत शिवसेेनेने भ्रष्टाचारच केलेला असून या पक्षाला महापालिकेपासून लांब ठेवण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून होईल.

मागील २५ वर्षांत शिवसेनेने महापालिकेत सत्ता असताना किती प्रकल्प केले, किती योजना राबवल्या आणि पायाभूत सुविधा प्रकल्प साकारले याची माहिती द्यावी,आणि आम्ही राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईत हाती घेतले प्रकल्प आणि विकास कामे तसेच पूर्ण केलेले पायाभूत प्रकल्प यांची देतो अशा शब्दांतच साटम यांनी उबाठाला आव्हान दिले आहे.
Comments
Add Comment

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करणार

आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था

आज मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक नाही

मुंबई : दर मंगळवारी होणारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक २५ नोव्हेंबर रोजी होणार नाही. स्थानिक स्वराज्य

आहे त्याच दरात, लोकलचा प्रवास होणार गारेगार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील युवकांना आश्वासन मुंबई : आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच प्रारुप मतदार यादी केली प्रसिध्द

महापालिकेने केले स्पष्ट मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रारुप