ठाण्याच्या मेट्रोचे डिसेंबरमध्ये होणार उद्घाटन, 'या' मार्गावर धावणार मेट्रो


ठाणे : ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा डिसेंबर २०२५ मध्येच सुरू होणार आहे. उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. उद्घाटनानंतर काही तासांतच ठाणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे. मूळ योजनेनुसार ठाण्यातील मेट्रो पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांवर सेवा देणार होती. पण उद्घाटनानंतर सुरुवातीला चार स्थानकांवरच ठाणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे. लवकरच इतर स्थानकांसाठीही ठाणे मेट्रो सेवा सुरू होणार आहे.


राज्य सरकारच्या महापारेषण कंपनीकडून वीज वाहिन्यांबाबत आवश्यक परवानगी मिळण्यात वेळ लागल्यामुळे उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यास वेळ लागला, असे एमएमआरडीएने सांगितले. सध्या एमएमआरडीए उद्घाटनाच्या तयारीत गुंतली आहे.


ठाण्याला मेट्रोद्वारे थेट मुंबईशी जोडण्यासाठी घोडबंदर रोडवरील गायमुख-कासारवडवली ते मुलुंड-घाटकोपरमार्गे वडाळा अशी मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. ही मेट्रो लाइन-4 आणि 4ए अशी ओळखली जाते. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशी दहा स्थानकांची सेवा सुरू करण्याचा आराखडा होता. पण तांत्रिक कारणांमुळे सुरुवातीला फक्त चार स्थानकांदरम्यानच मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या गायमुख ते कापूरबवाडी दरम्यान घोडबंदर रस्त्यावरून जातात. पातलीपाडा जंक्शन परिसरात या वाहिन्या मेट्रो मार्गिकेच्या वरून जात असल्याने त्या उंचीवर नेण्याचे काम आवश्यक होते. मात्र या बदलासाठी परवानगी आणि तांत्रिक प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे संपूर्ण मार्गिकेचे काम अडचणीत आले. यामुळे पूर्ण दहा स्थानके एकाच वेळी सुरू करणे शक्य झाले नाही.


पूर्णपणे तयार असलेल्या चार स्थानकांदरम्यानच मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही चार स्थानके कोणती असतील याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.


Comments
Add Comment

जीडीपी ६.८ पेक्षा जास्त वेगाने वाढणार - मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन

प्रतिनिधी:मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी शुक्रवारी भारतीय अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे

एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील अंतिम उमेदवार यादीवर आक्षेप घेत एमसीएच्या काही

मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

मुंबई (प्रतिनिधी): हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रविभवन येथील मंत्र्यांच्या बंगल्यांवर

मुंबई महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात उंदरांचा हैदोस

आयुक्तांचा कोट कुरतडला, भेटवस्तूंची केली नासधूस मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील मूषकांचा त्रास दूर करण्याचा

पार्थ पवार प्रकरणात काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना जमीन व्यवहार

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात