विशाखापट्टणम:आज गुगलने आंध्र प्रदेशातील विशाखाप ट्टणम येथे गिगावॅट-स्केल आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) हब स्थापन करण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली. युएस बाहेर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब बनवण्यासाठी गुगलकडून हा पहिलाच उपक्रम (हब) असणार आहे. यासाठीच कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याची ही मोठी घोषणा दिल्लीतील 'भारत एआय शक्ती' कार्यक्रमा दरम्यान केली आहे.दिल्लीतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,अदानी एंटरप्रायझेस, त्यांच्या संयुक्त उपक्रम अदानीकॉनएक्सद्वारे, विशाखापट्टणममध्ये भव्य डेटा सेंटर कॅम्पस बांधण्यासाठी गुगलसोबत भागीदारी करेल. अदानी समुहाने दिलेल्या निवेदनानुसार, हा प्रकल्प अर्थ वर्ष २०२६ ते २०३० पर्यंत पाच वर्षांत विकसित केला जाईल आणि या हबमध्ये अक्षय ऊर्जेवर चालणारे तसेच मजबूत सबसी केबल नेटवर्कद्वारे जोडलेले गिगावॅट-स्केल डेटा सेंटर ऑपरेशन्स समाविष्ट असणार आहेत.अदानीची संयुक्त कंपनी अदानीकॉनएक्स द्वारे राबविण्यात येणारा हा उपक्रम एअरटेलसह इकोसिस्टम भागीदारांच्या सहकार्याने विकसित केला जाईल.या प्रकल्पात नवीन ट्रान्समिशन लाईन्स, स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि प्रगत ऊर्जा साठवणूक प्रणालींमध्ये सह-गुंतवणूक समाविष्ट आहे, जे दोन्ही डेटा सेंटरच्या कामकाजाला समर्थन देतात.
या उपक्रमाबद्दल बोलताना, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले,'भारताच्या डिजिटल लँडस्केपचे भविष्य निश्चित करणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पात अदानी समूहाला गुगलसोबत भागीदारी करण्याचा अभिमान आहे. हे केवळ पायाभूत सुविधांम ध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त आहे. हे एका उदयोन्मुख राष्ट्राच्या आत्म्यात गुंतवणूक आहे.ही भागीदारी राष्ट्रनिर्मितीच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनाचे आणि २१ व्या शतकातील साधनांसह प्रत्येक भारतीयाला सक्षम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रमाण आ हे. विशाखापट्टणम आता तंत्रज्ञानासाठी जागतिक गंतव्यस्थान बनण्यास सज्ज आहे आणि आम्हाला या भव्य प्रवासाचे शिल्पकार होण्यास आनंद होत आहे.'
एआय पायाभूत सुविधांसाठी टेक दिग्गजांनी एआय अनुप्रयो गांसाठी आवश्यक असलेली प्रचंड संगणकीय शक्ती हाताळू शकतील असे डेटा सेंटर तयार करण्यासाठी ही मोठी गुंतवणूक केली जात आहे एकट्या गुगलने या वर्षी जगभरात त्यांच्या डेटा पायाभूत सु विधांचा विस्तार करण्यासाठी सुमारे $८५ अब्ज खर्च करण्याची योजना आखली आहे.
आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या अंदाजानुसार ही गुंतवणूक १० अब्ज डॉलर्स इतकी होती, परंतु गुगलने आता दीर्घकालीन क्षमता आणि शाश्वतता उद्दिष्टांना पाठिंबा देण्या साठी जास्त खर्चाची घोषणा यावेळी केली आहे. भारताच्या एआय आणि डिजिटल इ कोसिस्टमसाठी मोठा प्रयत्न करताना ही घोषणा करण्यात आली त्यावेळी गुगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी थॉमस कुरियन कार्यक्रमात म्हणाले आहेत की,' विशाखापट्टणम हब भारताला जागतिक एआय नवोपक्रमात (Initiative) एक केंद्रीय खेळाडू (Central Player) बनवेल'. 'हे गिगावॅट-स्केल एआय हब स्थानिक पातळीवर डेटा ठेवेल आणि सर्व क्षेत्रांमध्ये एआय-चालित उपायांना शक्ती देण्यास मदत करेल' असे कुरियन म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ही गुंतवणूक भारताच्या डिजिटल विकासासाठी आणि स्थानि क पातळीवर एकात्मिक, शाश्वत डेटा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुगलच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला अधोरेखित करते. ही सुविधा संगणन आणि एआय संशोधनासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून काम करेल, जागतिक एआय क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या भारता च्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देईल.
अमेरिकेबाहेर गुगलने केलेली सर्वात मोठी एआय गुंतवणूक
गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी विशाखापट्टणम प्रकल्पाचे वर्णन कंपनीचे अमेरिकेबाहेर जगात कुठेही सर्वात मोठे एआय हब गुंतवणूक असे केले आहे. येणारा १ गिगावॅट डेटा सेंटर कॅम्पस गुगलच्या विस्तारणाऱ्या जागतिक नेटवर्कमध्ये एक महत्त्वा चा भाग म्हणून काम करेल, ज्यामुळे कंपनीला प्रगत एआय वर्कलोड आणि क्लाउड सेवांना ऊर्जा मिळू शकेल असेही ते पुढे म्हणाले आहेत.सुंदर पिचाई यांनी विशाखापट्टणम एआय डेटा सेंटरवर पंतप्रधान मोदींशी संवाद साधला त्यावेळी कंपनीच्या पहिल्या ए आय हबच्या योजनांबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट पिचई यांनी घेतली.
एका ट्विटमध्ये पिचाई म्हणाले आहेत की,'विशाखापट्टण ममध्ये पहिल्या गुगल एआय हबसाठी आमच्या योजना शेअर करण्यासाठी भारताचे पंतप्रधान @narendramodi @OfficialINDIAai सोबत बोलणे खूप आनंददायी आहे, हा एक महत्त्वाचा विकास आहे'
ते पुढे म्हणाले, 'हे हब गिगावॅट-स्केल कॉम्प्युट क्षमता, एक नवीन आंतरराष्ट्रीय सबसी गेटवे आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा पायाभूत सुविधांचा मेळ घालते. त्याद्वारे आम्ही भारतातील उद्योग आणि वापरकर्त्यांपर्यंत आमचे उद्योग-अग्रणी तंत्रज्ञान पोहोचवू, एआय नवो पक्रमाला गती देऊ आणि देशभरात वाढ करू.'
माहितीनुसार, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी भारतात डेटा सेंटर प्रकल्पांसाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे देशातील जवळजवळ एक अब्ज इंटरनेट वापरकर्त्यांना क्लाउड आणि एआय-चालित सेवांसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून प्रकाशझोतात आली आहे.