कोलेस्टेरॉलचा वाढणारा धोका टाळा, शरीर आणि त्वचेवर होणारे बदल वेळीच ओळखा...

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सगळेच जण अरबटचरबट खात असतात. या सवयीमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत चालेल आहे. या वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. डोकेदुखी आणि छातीत दुखणे हेच फक्त कोलेस्टेरॉलचे संकेत नसतात. तर तुमची त्वचा सुद्धा कोलेस्टेरॉल मोठा संकेत आहे.


त्वचेवरही कोलेस्टेरॉलचा परिणाम होतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखा आणि गंभीर हृदयविकार टाळा. तुमचा कोलेस्टेरॉल किती प्रमाणात वाढले आहे हे बघण्यासाठी पुढील ५ लक्षणे जाणून घ्या.


१. झॅन्थेलाझ्मा


झॅन्थेलाझ्मा म्हणजे डोळ्यांभोवती आलेले पिवळे डाग. डोळ्यांभोवती वा पापण्यांवर लहान पिवळे डाग दिसू लागले तर कोलेस्टेरॉल वाढत आहे हे समजून घ्या. झॅन्थेलाझ्मा हे रक्तात कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात आहे असे सुचवतो. आणि हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.


२. झेंथोमा


झेंथोमा म्हणजे शरीरावर पिवळसर लहान गाठी दिसतात. जास्त चरबी वाढल्याने या गाठी तयार होतात. कोपर, गुढघे, हात आणि पायावर जास्त वेळा या गाठी दिसून येतात.


३. बॅड कोलेस्टेरॉल


बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे त्वचेची खाज आणि जळजळ होणे. शरीरावर खाज आणि लालसरपणा जाणवत असेल तर ही बॅड कोलेस्टेरॉलची लक्षणे आहेत.


४. पाय थंड पडणे


धमन्यांतील कोलेस्टेरॉल वाढले की रक्तप्रवाहाचा वेग मंदावतो. यामुळे पाय थंड पडतात.


५. नख आणि त्वचेच्या रंगांमध्ये बदल

कोलेस्टेरॉल वाढले की रक्त शुद्ध होण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे शरीरातील अनेक अवयवांना वेळेत शुद्ध रक्त मिळत नाही. नखं निस्तेज होतात, पिवळी पडतात. त्वचाविकारांचा धोका वाढतो.



कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे ?


१. तळलेले तेलकट खाणे टाळा. भाज्या , पालेभाज्या, फळ , फायबर आणि प्रथिने युक्त आहार घ्या


२. किमान ३० मिनिटे व्यायाम करा.


३. धूम्रपान आणि मद्यपान करू नका


४. नियमित रक्त तपासत राहा आणि कोलेस्टेरॉलचीही तपासणी करत राहा

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये जरूर खा या भाज्या, रहाल निरोगी आणि फिट

मुंबई: ऑक्टोबर महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्याने (मान्सून ते हिवाळा संक्रमण), या काळात रोगप्रतिकारशक्ती

हिवाळ्यातील सुपरफूड! तीळ खाल्ल्याने हृदय, हाडे आणि त्वचेला मिळतात फायदे. जाणून घ्या जबरदस्त फायदे

तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड

दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या

मायग्रेन का होतो? आणि त्याचे सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे जी सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या