मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेर घसरणीनेच झाली. एक आठवडा तेजीचा अश्वमेध आज बाजाराने नव्या आठवड्यातील सुरूवातीलाच रोखला. मोठ्या प्रमाणात घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सेल ऑफ झाल्याचा फट का बाजारात बसला आहे. दिवसभरात शेअर्समध्ये वारे सुरू असताना केवळ बँक व फायनांशियल सर्विसेस शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात अतिरिक्त घसरण रोखली गेली. सकाळी १०.३१% उसळलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ८.९५% पातळीवर स्थिरावला आहे. मिडस्मॉल व लार्जकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटका एकूणच निर्देशांकात बसला आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स १७३.७७ अंकांने घसरत ८२३२७.०५ पातळीवर व निफ्टी ५८.०० अंकाने घसरत २५२२७.३५ पातळी वर स्थिरावला आहे.
आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्रित कौल कायम राहिला. सर्वाधिक वाढ फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.९२%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.०२%),फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.३५%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.१३%), आयटी (०.७८%), एफएमसीजी (०.९०%), मेटल (०.४३%) निर्देशांकात घसरण झाली आहे. आज ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही घसरण कायम राहिली. दिग्गज शेअर्सपैकी एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोट र्स, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली असून हेवी वेट शेअरमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी एएमसी, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये मात्र वाढ झाली होती.
आज दिवसभरात जागतिक अस्थिरतेचा फटका कमोडिटीला बसला आहे. जागतिक सोने, डॉलरमध्ये मोठी वाढ झाली असून भारतीय रूपयात आज घसरण कायम राहिली. परिणामी परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. याखेरीज चीनवर युएसकडून अतिरिक्त १००% शुल्क आकारले जाण्याचे घोषित झाल्यानंतर बाजाराने 'बिअरीश' कल बाजारात दर्शवला आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलातही भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, मध्यपूर्वेतील घडामोडी, रशिया युक्रेन वाद, तसेच युएस सरकारचे शटडाऊन, या कारणामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. डाऊ जोन्स (०.९१%) वगळता इतर एस अँड पी ५०० (२.७१%) नासडाक (३.५६%) इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळले आहे.
आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.३८%) सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली. ज्यामध्ये सर्वाधिक घसरण ही हेंगसेंग (१.६५%), जकार्ता कंपोझिट (०.३७%), स्ट्रेट टाईम्स (०.८५%), निकेयी २२५ (१.०२%) निर्देशांकात झाले आहे. सुरूवातीच्या कलात चीन वरील वक्तव्याचा युएस बाजारातील आधीचा सत्रात मोठा फटका बसला. मात्र पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भाषा मृदू केल्याने पुन्हा एकदा जागतिक गुंतवणूकदारांना सकारात्मकता वाटते ट्रम्प म्हटले की अमेरिका चीनला मदत करू इच्छिते, त्याला नु कसान पोहोचवू इच्छित नाही ज्यामुळे अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक स्टॉक फ्युचर्समध्ये पुन्हा तेजी आली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ज्युब्लिअंट इनग्रेव्ह (८.४५%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (६.७५%), केफिन टेक्नॉलॉजी (६.६५%), सीई इन्फोसिस्टिम (४.९८%), युटीआय एएमसी (४.५९%), आदित्य एएमसी (४.४५%), जेएम फायनांशियल (४%), बीएसई ( ३.८२%), अदानी पॉवर (३.१६%), एमसीएक्स (२.८७%), एथर एनर्जी (२.७९%), एचडीएफसी एएमसी (२.७०%), बजाज होल्डिंग्स (२.३२%), फेडरल बँक (२.२७%), अदानी पोर्ट (२.०७%) समभागात झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण बीएलएस इंटरनॅशनल (११.०८%), रिलायन्स पॉवर (३.८३%), टाटा कम्युनिकेशन (३.८५%), रेडिंगटन (३.६९%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.४३%), वोडाफोन आयडिया (३.४३%), डेटा पँटर्न (३.१३%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (३.०२ % ), डॉ अग्रवाल हेल्थकेअर (२.९४%), एल अँड टी टेक्नॉलॉजी (२.८६%), गोदरेज इंडस्ट्रीज (२.८२%), अव्हेन्यू सुपरमार्ट (२.७३%), व्होल्टास (२.७४%), टाटा मोटर्स (२.६८%), झेंसार टेक्नॉलॉजी (२.६८%), एसबीएफसी फायनान्स (२.५५%), क्रिसील (२.३५ %), सिमेन्स (२.२२%), कल्याण ज्वेलर्स (२.०७%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकेतील चालू सरकारी बंद आणि अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे आशियामध्ये जोखीम कमी होण्याची भावना निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारांनी आठव ड्याची सुरुवात सावधगिरीने केली. अलिकडच्या काळात झालेल्या तेजीनंतर उपभोग आणि विवेकाधीन क्षेत्रात नफा बुकिंगमुळे गुंतवणूकदारांच्या स्थितीत रणनीतिक बदल झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या तिमाहीतील मिश्र उत्पन्नामुळे भावनांवर आणखी परिणाम झाला, आयटी शेअर्सची कामगिरी चांगली झाली, तर नियामक सवलतीनंतर वित्तीय कंपन्यांनी निवडक खरेदी आकर्षित केली. मध्यम आणि स्मॉल-कॅप शेअर्सनी सकारात्मक वातावरण राखले. जरी INR मध्ये किरकोळ सुधारणा आणि महागाईच्या अपेक्षा कमी झाल्यामुळे तोटा कमी होण्यास मदत झाली, तरी एकूण भावना सुरक्षित राहिली, ज्यामुळे बाजार किंचित नकारात्मक पूर्वाग्रहाखाली राहिले.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'अमेरिकेतील चालू सरकारी बंद आणि अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे आशियामध्ये जोखीम कमी होण्याची भावना निर्माण झाल्यामुळे देशां तर्गत बाजारांनी आठवड्याची सुरुवात सावधगिरीने केली. अलिकडच्या काळात झालेल्या तेजीनंतर उपभोग आणि विवेकाधीन क्षेत्रात नफा बुकिंगमुळे गुंतवणूकदारांच्या स्थितीत रणनीतिक बदल झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या तिमाहीतील मिश्र उत्पन्नामुळे भावनां वर आणखी परिणाम झाला, आयटी शेअर्सची कामगिरी चांगली झाली, तर नियामक सवलतीनंतर वित्तीय कंपन्यांनी निवडक खरेदी आकर्षित केली. मध्यम आणि स्मॉल-कॅप शेअर्सनी सकारात्मक वातावरण राखले. जरी रूपयांमध्ये किरकोळ सुधारणा आणि म हागाईच्या अपेक्षा कमी झाल्यामुळे तोटा कमी होण्यास मदत झाली, तरी एकूण भावना सुरक्षित राहिली, ज्यामुळे बाजार किंचित नकारात्मक पूर्वाग्रहाखाली राहिले.'