मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी



मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय संस्कृती अमीन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे संपूर्ण मुंबईत ऑडिट करावे अशीही मागणी आमदार अमीत साटम यांनी महापालिकेला केली आहे.

दुर्घटनेच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी महापालिकेत केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. जर हे खरे असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे आमदार अमीत साटम यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमदार अमीत साटम यांनी संपूर्ण शहरात कडक सुरक्षा तपासणी करण्याचीही मागणी केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी बीएमसीने सर्व बांधकाम सुरू असलेल्या जागांचे ऑडिट करावे. कोणतेही उल्लंघन आढळून आल्यास लवकरात लवकर त्यावर उचित उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित होईपर्यंत काम थांबवण्याच्या नोटीसा द्याव्यात, असे आमदार अमीत साटम यांनी पुढे सांगितले. 

Comments
Add Comment

जोगेश्वरीत वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांना अटक

जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या!

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी

Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना

मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांना भीष आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीच्या

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या ! विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी): एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी