मुंबई : सॅमसंगने भारतात आपला नवीन Galaxy M17 5G लाँच केला आहे. हा फोन सर्वसामान्य ग्राहकांना लक्षात घेऊन बाजारात आणण्यात आला आहे. आकर्षक डिझाईन, मजबूत फीचर्स आणि दीर्घकाळ टिकणारी परफॉर्मन्स देणारा हा फोन केवळ ₹12,499 पासून उपलब्ध आहे.
किंमत आणि व्हेरिएंट्स
सॅमसंग गॅलक्सी M17 5G तीन प्रकारांत बाजारात आला आहे:
4GB RAM + 128GB Storage — ₹12,499
6GB RAM + 128GB Storage — ₹13,999
8GB RAM + 128GB Storage — ₹15,499
हा फोन दोन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Galaxy M17 5G बाजारात Vivo T5G, Poco M7 Pro 5G, Redmi Note 14 SE 5G आणि Tecno Pova 7 5G सारख्या फोनना थेट टक्कर देणार आहे.
दमदार स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले : ६.७ इंचाचा Super AMOLED Full HD+ डिस्प्ले, ११०० निट्स पीक ब्राईटनेस आणि Gorilla Glass सन प्रोटेक्शनसह.
चिपसेट : गती आणि मल्टीटास्किंगसाठी Exynos 1300 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप : ट्रिपल कॅमेरा सिस्टम, 50MP OIS प्रायमरी सेन्सर, अल्ट्रावाईड लेन्स, 2MP मॅक्रो सेन्सर, फ्रंट कॅमेरा 13MP सेल्फी कॅमेरा
बॅटरी : 5000mAh क्षमतेची दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट.
सॉफ्टवेअर आणि सुरक्षा : सॅमसंगने या मॉडेलसाठी 6 वर्षांची सिक्युरिटी अपडेट्स आणि 6 OS अपग्रेड्स देण्याचे वचन दिले आहे — जे या किमतीच्या सेगमेंटमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे.
नवे फीचर्स
Galaxy M17 मध्ये आधुनिक फीचर्सचा समावेश आहे
Search with Google
Gemini Live सारखे AI फीचर्स
Tap Pay & GPay सपोर्ट
दीर्घकाळासाठीचा बॅटरी बॅकअप