भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात असून, त्यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल २० किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहे. या कारवाईत एका भारतीय तस्कराला अटक करण्यात आली आहे. तस्कराची चौकशी सुरू आहे.


बीएसएफच्या ३२व्या बटालियनने ही यशस्वी कारवाई हरांदिपूर बीओपी (Border Outpost) परिसरात केली. दलाला मुस्लिमपारा गावातील एका भारतीयाने सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती दिली. बांगलादेशमधून २० किलो सोनं बेकायदेशीररत्या भारतात आणलं जात होतं. ठोस माहिती मिळताच सीमा सुरक्षा दलाने गस्त वाढवली आणि सावध राहून तस्कराला सोन्यासह पकडले.


शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास, हरांदिपूर परिसरातील दाट बांबूच्या झाडांजवळ एक संशयास्पद व्यक्ती फिरताना जवानांना आढळली. जवानांनी तात्काळ त्या भागाला वेढा घालून संशयितास अटक केली. अटक केल्यानंतर झालेल्या झडतीदरम्यान त्या व्यक्तीकडून एक प्लास्टिकची पिशवी सापडली. पिशवी उघडली असता त्यामध्ये २० सोन्याची बिस्किट्स असल्याचे आढळले. या बिस्किट्सचे एकूण वजन सुमारे २० किलो असून, बाजारमूल्य अंदाजे २.८२ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.


बीएसएफने अटक केलेल्या व्यक्तीस हरांदिपूर बीओपीमध्ये आणून प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर आरोपीस आणि जप्त केलेलं सोनं संबंधित कस्टम विभाग व अन्य तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, या तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.


पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या अनेक भागांमध्ये सोनं, ड्रग्स, गुटखा यांसारख्या वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं वारंवार निदर्शनास आलं आहे. यामुळे बीएसएफसाठी ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. मात्र, बीएसएफच्या सतर्कतेमुळे अशा अनेक प्रयत्नांना अलीकडच्या काळात अपयश आले आहे. बीएसएफने स्थानिक नागरिकांना आवाहन केलं आहे की, सीमेवर काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या