Saturday, October 11, 2025

आमंत्रण नसतानाही बिग बींच्या बर्थडेला 'ती' आली अन् बाथरूममध्ये लपली!

आमंत्रण नसतानाही बिग बींच्या बर्थडेला 'ती' आली अन् बाथरूममध्ये लपली!

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील अनेक किस्से आजही चर्चेत असतात. विशेषत: त्यांचे आणि अभिनेत्री रेखा यांचे नाते अनेक वर्षांपासून गूढतेचा विषय राहिले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या आयुष्यातील एका अविस्मरणीय घटनेची चर्चा होत आहे.

निमंत्रण नसताना पार्टीत एन्ट्री

वर्ष २००२. ११ ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसाची मोठी पार्टी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत कुटुंबासह अनेक मित्र-मंडळी उपस्थित होते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सोहळ्याला रेखा यांना आमंत्रण नव्हते.

तरीही रेखा पार्टीत दाखल झाल्या. रेखा यांना पाहताच उपस्थित असलेल्या बच्चन कुटुंबासह सर्वांचे चेहरे आश्चर्यचकित झाले. एक मोठी अभिनेत्री बिना आमंत्रण पार्टीत कशी आली, याचेच सर्वांना आश्चर्य वाटले.

अनपेक्षित घटना आणि बाथरूमचा आश्रय

अमिताभ आणि रेखा यांच्या भेटीची ही बातमी मीडियापर्यंत पोहोचण्यास फारसा वेळ लागला नाही. काही क्षणातच फोटोग्राफर्सचा ताफा हॉटेलमध्ये दाखल झाला. कॅमेऱ्यांचा फ्लॅश आणि मीडियाची गर्दी पाहून रेखा इतक्या घाबरल्या की त्यांनी हॉटेलच्या बाथरूमकडे धाव घेतली आणि स्वतःला आतून बंद करून घेतले!

भीती होती 'त्या' फोटोंची

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा बराच वेळ बाथरूममध्ये बंद होत्या. मीडियाचे प्रतिनिधी पार्टीतून निघून गेल्याची खात्री झाल्यावरच त्या बाहेर आल्या. त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सार्वजनिक होऊ नयेत याची भीती वाटत होती. कारण या फोटोंमुळे पुन्हा एकदा खळबळ माजेल अशी त्यांना अजिबात इच्छा नव्हती.

अनेक चित्रपटांत दोघांनी एकत्र काम केलेले हे दोन दिग्गज कलाकार. अमिताभ बच्चन आता कुटुंबासोबत आहेत, तर रेखा आजही सिंगल राहून त्यांचे आयुष्य जगत आहेत.

Comments
Add Comment