पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती


मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील ११०० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी विज्ञान परिसर, नवी दिल्ली येथे करण्यात आले. यानिमित्ताने अंधेरी येथील आयसीएआर-सीआयएफइ कॅम्पस येथे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेचे सहसंचालक डॉ. नरोत्तम साहू, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अर्पिता शर्मा, तसेच संस्थेचे इतर वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.


कार्यक्रमात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत आहे. केंद्र-राज्य सरकारच्या समन्वयातून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल. यामुळे शाश्वत शेतीला अधिक चालना मिळून उत्पादनही वाढेल. आपल्या राज्य सरकारने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. हीच योजना देशपातळीवर राबविण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ आता मच्छीमार बांधवांनाही मिळेल,’ असेही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

जहाज आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज; कोचीत राहणार तैनात पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय