रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर १६% इंट्राडे उच्चांकावर ! 'या' कारणामुळे

मोहित सोमण:रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर आज थेट दिवसभरात मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात कंपनीचा शेअर १६% पर्यंत इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. सकाळी ११ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १५% हून अधिक उसळला होता. तर दुपारी ३.०८ वा जेपर्यंत कंपनीचा शेअर १०.१०% उसळला होता. प्रामुख्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात या शेअर व्हॉल्यूममध्ये वाढ झाली. परिणामी शेअर मागणीमुळे ट्रान्सफर झाल्याने मोठ्या प्रमाणात शेअरला महत्व प्राप्त झाले. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १५% उसळत ५०.७५ रूपये प्रति शेअरवर पोहोचला होता. मागच्या आठवड्यात कंपनीला सेबीकडून शो कॉज नोटिस (कारणे दाखवा) नोटीस मिळाली होती. कारण सीएलई प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (CLE Private Limited) मध्ये एक्स्पोजर मर्यादेबाबत आणि इत र खुलांशाबाबत ही नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र कंपनीकडून सगळ्या आरोपांना नकार देताना स्पष्टीकरण आले आहे की कंपनीने कुठल्याही प्रकारच्या या कंपनीतील आर्थिक संबंधांना नकार दिला आहे. तसेच नोटीस येण्यापूर्वीच उपस्थित केलेल्या अनु पालनाविषयी अनियमिता (Compliance Irregularities) तसेच इतर स्क्रूटिनीविषयी आपण स्पष्टीकरण दिले असल्याचे कंपनीने म्हटले. तसेच याबाबत आपण कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पाऊल उचलणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.


या घटनांच्या पार्श्वभूमीवर अचानक शेअर चर्चेत येताच थेट ७ कोटी इक्विटी शेअर्समध्ये मालकी हक्क (Transfer) बदलले गेल्याचे कंपनीच्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. ज्यामध्ये आज व्यवहार वाढल्याने शेअरची किंमतही वाढली आहे. अखेरच्या सत्रात कंप नीचा शेअर ८.७७% उसळीसह व्यवहार करत होता.


पहिल्या तिमाहीत कंपनीला एकत्रित (Consolidated) नफा ४४.६८ कोटींचा झाला होता. तर मागील वर्षाच्या तिमाहीत तर कंपनीला ९७.८५ कोटीचा तोटा झाला होता.आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल (Revenue fro m Operations) ५.३% ने घसरून १८८५.५८ कोटी रुपये झाला, जो आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत १९९२.२३ कोटी रुपयांवरून कमी झाला आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत १९७८.०१ कोटी रुपयांवरून अनुक्रमे ४.७% ने घसरला. आ र्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत एकूण उत्पन्न २०२५ कोटी रुपये होते, जी गेल्या वर्षीच्या २०६९ कोटी रुपयांवरून २% घसरण झाली आहे.


रिलायन्स पॉवरचे शेअर्स एका महिन्यात ३% पेक्षा जास्त वाढले आहेत परंतु तीन महिन्यांत २५% पेक्षा जास्त घसरले आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग