गोरेगाव पशुवैद्यमल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता

ॲड. अशिष शेलार यांच्या पाठपुराव्याला यश


मुंबई उपनगरातील पशुप्रेमींना दिलासा!.


मुंबई : गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास रु. ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता आजच देण्यात आली आहे. उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आज या पशुबैद्यकीय रुगाणालयाच्या पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता जारी केली. उपनगरीतील पाळीव आणि निसर्ग मुक्त पशूंसाठी उत्कृष्ट उपचार व सेवांची सुविधा उभारली जाईल असे प्रतिपादन उपनगर पालकमंत्री श्री अशिष शेलार यांनी केले आहे.


नव्या इमारतीत तळमजला व तीन मजले असा आराखडा असून सुमारे १०,२१० चौ. मीटर पृष्ठभागातील या रुग्णालयात लहान-मोठ्या प्राण्यांसाठी अत्याधुनिक व बहुविध सेवांचा समावेश आहे. उपनगरातील व मुंबईतील विविध भागातील प्राण्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना ही सुविधा मोलाची ठरणार आहे. या प्रकल्पात वास्तुविशारदांची मान्यता, सौरऊर्जा प्रणालीची उभारणी व पर्यावरणपूरक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.


शासनाच्या या निर्णयामुळे पशुप्रेमी, शेतकरी, रहिवासी व मुंबई महानगरातील अनेकांची जुनी मागणी पूर्ण होत आहे. नव्या मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे प्राण्यांच्या आरोग्यसेवेतील दर्जा आणि उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, अशिष शेलार यांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 'ईशान सेतू' उपक्रमात सहभागी मुंबई

Kurla Incident : कुर्ल्यातील शितल तलावात १९ वर्षीय युवक बुडाला; शोधकार्य सुरू

मुंबई : मुंबईतील कुर्ला (Kurla) पश्चिम येथील शितल तलावात (Sheetal Talao) शुक्रवारी (१७ जुलै) एका १९ वर्षीय तरुण बुडाल्याची (Drowning)

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)