
प्रतिनिधी: आज नव्या कॉर्पोरेट अँक्शन प्रकाशधोतात असणार आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आज १ व उद्या ४ कंपनीच्या लाभपात्र शेअर खरेदी करण्यासाठी शेवटची एक्स तारीख (Ex Date) घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे लाभा र्थी गुंतवणूकदारांना बोनस शेअर खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.
ती यादी पाहूयात....
१) Valiant Communications Limited - उद्या १० ऑक्टोबरला कंपनीचे बोनस शेअर खरेदी करण्यासाठी रेकोर्ड डेट घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे परवापासून कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याऱ्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर मिळणार नाही. १:२ प्रमाणात हे बोनस शेअर मुदतपूर्व काळात खरेदी करणाऱ्या भागभांडवलधारकांना मिळणार आहे. म्हणजेच एका शेअरमागे गुंतवणूकदारांना दोन शेअर मिळणार आहेत. सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर २% घसरला आहे.
२) Narmada Macplast Limited- गुंतवणूकदारांसाठी उद्या १० ऑक्टोबरला रेकोर्ड डेट अंतर्गत बोनस शेअरसाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे एकास एक (१:१) प्रमाणात हे शेअर वाटप लाभार्थी गुंतवणूकदारांना करण्यात येईल. सकाळ च्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.३९% तेजी पहायला मिळत आहे.
३) Purity Flexpack Limited - लाभार्थी गुंतवणूकदारांना २:१ प्रमाणात बोनस शेअर मिळणार आहेत. यासाठी रेकोर्ड तारीख उद्या १० ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर गुंतवलेल्या समभागधारकांना याचा लाभ होणार नाही. सकाळच्या स त्रात कंपनीचा शेअर ४.४७% उसळला होता.
४) Ujjas Energy Limited- कंपनीच्या बोनस शेअरसाठी उद्या १० ऑक्टोबरला रेकोर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी गुंतवणूकदारांना २:१ प्रमाणात हे बोनस शेअर मिळतील. म्हणजेच प्रत्येक दोन शेअर मागे लाभार्थी गुंतवणूकदारांना १ बो नस शेअर मिळणार आहे. कंपनीचा शेअर सकाळच्या सत्रात ४.९९% उसळला होता.
५) Harshil Agrotech Limited - कंपनीकडून आज १० ऑक्टोबर ही तारीख लाभार्थी गुंतवणूकदारांसाठी रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली गेली आहे. पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे वाटप उद्यापर्यंतच कंपनीच्या शेअर खरेदी केलेल्या गुंतवणुकदारां ना मिळणार आहे. कंपनी १०:३२ प्रमाणात बोनस समभागाचे (Stocks) वाटप करणार आहे. म्हणजेच प्रत्येक १० शेअरमागे गुंतवणूकदारांना ३२ शेअर मिळवण्याची संधी चालून आली आहे. सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर ४.७६% उसळला होता.
आज ९ ऑक्टोबरला Chandrima Mercantiles Limited ची अंतिम मुदत -
कंपनीकडून बोनस शेअरसाठी आज रेकोर्ड तारीख निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र गुंतवणूकदारांना बोनस समभागाचे वाटप आजपर्यंत समभाग खरेदी केलेल्यांना होऊ शकते. १:२ प्रमाणात बोनस शेअरचे वाटप संबंधित गुंतवणूकदारांना करण्यात येईल. म्हणजेच एका शेअरमागे दोन अधिकचे शेअर गुंतवणूकदारांना मिळतील.