मोहित सोमण: मिडकॅप व लार्जकॅपमध्ये झालेल्या रॅलीमुळे आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. विशेषतः मेटल, फार्मा, आयटी, हेल्थकेअर या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे आज शेअर बाजारात समाधानकारक वाढ झाली. त्यामुळे बाजार आज पुन्हा रिबाऊं ड स्थितीत पोहोचले आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३९८.४४ अंकाने उसळत ८२१७२.१० पातळीवर स्थिरावला असून निफ्टी निर्देशांकात १३५.६५ अंकांची वाढ झाली असून निर्देशांक २५१८१.८० पातळीवर स्थिरावला आहे. विशेषतः आज सकाळची वाढ अखेर च्या सत्रात मोठ्या प्रमाणात घरगुती गुंतवणूकदारांनी रोख गुंतवणूक वाढवल्याने आज बाजारात तुलनात्मकदृष्ट्या वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा पट्टीतील हस्तक्षेपाचा निर्णयाने जागतिक भूराजकीय अस्थिर स्थिती काहीशी कमी झाल्याने जागतिक गुं तवणूकदारांच्या आत्मविश्वासात भर पडली ज्याचा भावनिक फायदा शेअर बाजाराला झाला आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयटी (१.०७%), मेटल (२.१७%), हेल्थकेअर (१.०७%), फार्मास्युटिकल (१.०५%) निर्देशांकात झाला आहे. युएससह भारताच्या आयटी शेअर्समध्ये सुरू असलेली रॅली आजही सुरूच राहिल्याने बाजा राने सपोर्ट लेवल राखली आहे. विशेषतः आज सत्र संपल्यानंतर टीसीएसचा तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा प्रतिसाद दिल्याने शेअर १.०९% उसळीसह बंद झाला आहे. आज फार्मा कंपन्यानी चांगले प्रदर्शन केले आहे. विश्लेष कांचा चांगल्या आऊटलूकचा फायदा फार्मा शेअर्समध्ये झाला. याखेरीज जागतिक बाजारपेठेत कमोडिटी बाजारातील दबावही घसरल्यानंतर त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होत आहे. सोन्याच्या किमतीसह कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही आज घसरण झाल्याने एकूण सकारात्मक भावना बाजारात परावर्तित झाल्या.
तरीदेखील काही प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारां कडून व घरगुती गुंतवणूकदारांकडून घेण्यात आलेल्या काळ जीचा काही प्रमाणात फटका बाजारातील निर्देशांकात बसला. काही प्रमाणात सेल ऑफ झाला असून काही प्रमाणात क्षेत्रीय विशेष समभा गात नफा बुकिंगही झाले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आज शेअर बाजारात वाढ जरी झाली असली तरी बीएसईतील ४३५० समभागांपैकी २१०९ समभागात वाढ झाली असली तरी २०६९ समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. एनएसईतील ३१९१ स मभागांपैकी १६०० समभागात वाढ झाली असून १४९५ समभागात घसरण झाली आहे.
कालच्या जबाबदार रॅलीनंतर आज मात्र युएस बाजारातील सुरुवातीच्या कलात तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. डाऊ जोन्स (०.०९%), एस अँड पी ५०० (०.५८%), नासडाक (१.१२%) निर्देशांकात वाढ झाली आहे. तर आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात बहु तांश निर्देशांकात वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ उषा मार्टिन (७.९६%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (७.४७%), जीएमडीसी (७.३७%), हिंदुस्थान कॉपर (६.४१%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (६.०९%), एमसीएक्स (६.३१%), ग्राविटा इंडिया (४.६०%), अरबिंदो फार्मा (४.५९%), प्रे स्टिज इस्टेट (४.५६%), हिंदुस्थान झिंक (४.४३%), पीटीसी इंडस्ट्रीज (४.४३%), बीएसई (३.४३%), स्विगी (३.८०%), गो डिजिट जनरल (३.१३%), ल्युपिन (२.७३%), जेएसडब्लू स्टील (२.६२%), टाटा स्टील (२.६१%) समभागात झाली आहे. अखेरच्या सत्रात स र्वाधिक घसरण नेटवेब टेक्नॉलॉजी (९.०९%), आयटीआय (५.३१%), युनो मिंडा (३.९२%), फोर्स मोटर्स (२.८३%), होंडाई मोटर्स (२.६३%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (२.४४%), बाटा इंडिया (२.३९%), सफायर फूडस (२.४३%), एल टी फूडस (१.८८%), बजा ज होल्डिंग्स (१.५२%), एचबीएल इंजिनिअरिंग (१.५२%), लेमन ट्री हॉटेल (१.४१%), विशाल मेगामार्ट (१.३३%), आनंद राठी वेल्थ (१.३०%), सिमेन्स (१.१९%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,'गेले दोन दिवस बाजारात अगदी थोडी खरेदी विदेशी गुंतवणूकदारां कडून करण्यात आली.आज बऱ्यापैकी खरेदी विदेशी गुंतवणूकदारांकडू न असणार आहे. २४६०० वरून २५१५० ला येऊन थोडे करेक्शन येत आज बाजार परत सकारात्मक असणं आवश्यक होते.ब्रिटिश पंतप्रधान भारतात व्यापार चर्चा करायला आले आहेत. फ्री ट्रेड करार अगोदर च झालेला आहे. आता कोणकोणत्या क्षेत्रात व्यापार होणार हे ठरू शकेल. जपान ,अमेरीका या देशात व्याज दरकपात होण्याचे अपेक्षित असल्याने या दोन्ही देशातील शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे.तसेच इस्त्राईल व गाझा यांच्यात शांतता करार हे ही एक सकारात्मक कारण आहे..एकंदरीत जागति क स्थरावर थोडीफार परिस्थिती जरा बरी आहे, एवढेच... तोपर्यंत भारतातील बाजारात कंसोलिडेशन सुरू राहणार का पुढील आठवड्यात २५७०० तोडून निफ्टी नवीन उच्चांक दाखवणार ते बाजार ठरवेल, तोपर्यंत गुंतवणूक सुरूच ठेवा.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,' जागतिक बाजारातील मिश्र संकेत असूनही, भारतीय बाजारांनी दिवसाची सुरुवात मंदावलेल्या स्थितीत केली परंतु लवकरच तेजीत वाढ झाली. निफ्टी सं पूर्ण सत्रात सकारात्मक व्यवहार करत दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. क्षेत्रीयदृष्ट्या, धातू, आयटी, आरोग्यसेवा, फार्मा आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी तेजीत आघाडी घेतली, तर मीडिया शेअर्सनी स्थिर कामगिरी नोंदवली. ट्रम्प प्रशासनाने परदेशातू न आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर शुल्क लादणार नसल्याचे स्पष्ट केल्याने फार्मा शेअर्सना विशेष तेजी मिळाली. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, एमसीएक्स, युनोमिंडा, प्रेस्टिज आणि एम्बरपगेलमध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जी या काउंटरम धील सक्रिय सहभाग आणि तेजीची भावना दर्शवते.'
आजच्या टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'कालच्या नकारात्मकतेला बाजूला ठेवून निफ्टीने वरच्या दिशेने वाटचाल केली. तथापि, निर्देशांक २५२५० पातळीच्या प्रतिका र पातळीच्या खाली राहिला. अल्पकालीन भावना सकारात्मक राहिल्या आहेत, निर्देशांक दैनंदिन कालावधीत गंभीर हालचाली सरासरीपेक्षा वर आहे. वरच्या बाजूस, २५२५० पातळीच्या वर निर्णायक हालचाल अल्पावधीत २५६०० पातळीपर्यंत वाढू शकते, तर खा लच्या बाजूस, २५००० पातळीवर आधार आहे.'
आजच्या रूपयातील हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'परदेशी गुंतवणूकदारांच्या (FII) विक्रीत घट झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमती मर्यादित प्रमाणात मर्यादित राहिल्याने, रुपया ८८.७६ वर स्थिर राहिला, जो गेल्या आठवड्यापासून मर्यादित अस्थिरता दर्शवितो. तथापि, चलन कमी पातळीच्या जवळ आहे, ज्यामुळे जागतिक भावना कमकुवत झाल्यास आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, कदाचित ९० च्या पातळीवर ...पुढील काही दिवसांचे लक्ष फेड चेअर पॉवेल यांच्या भाषणावर आणि बेरोजगारी आणि नॉन-फार्म पेरोलवरील अमेरिकेच्या प्रमुख डेटावर आहे, जे सर्व फॉरेक्स मार्केटमध्ये तीव्र अस्थिरता आणू शकतात. रुपयाची श्रेणी ८८.४५-८८.९५ दरम्यान अपेक्षित आहे.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याच्या किमतीत आज एका मर्यादित श्रेणीत व्यवहार झाला, ज्यामध्ये अलिकडच्या काळात किमतीं मध्ये वाढ झाली आहे. अमेरिकन सरकारच्या शटडाऊनच्या चिंता आणि वाढत्या "डॉलरायझेशन" थीममुळे सोन्यातील सातत्यपूर्ण गतीला पाठिंबा आहे, ज्यामुळे सुरक्षित-निश्चित मागणी वाढत आहे. देशांतर्गत बाजारात १२३१०० आणि कॉमेक्सवर $४००० पेक्षा जा स्त, सोने जास्त खरेदीच्या क्षेत्रात आहे, जे तीव्र सुधारात्मक हालचालीची शक्यता दर्शवते. नफा सुरक्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी कठोर ट्रेलिंग स्टॉप-लॉस राखले पाहिजेत. नजीकच्या काळात, सोने १२१,५०० ते १२५००० रूपयांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत वाढ दिसून आली, तर धातू निर्देशांकांनी चांगली काम गिरी केली, ज्याचे नेतृत्व बेस मेटलच्या किमतींमध्ये वाढ झाले. वित्त आणि आयटी आणि फार्मा सारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रांवरील अपेक्षा मंदावल्यामुळे Q2FY26 चा उत्पन्न हंगाम सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याने H2F Y26 मध्ये एकूण वातावरण जोरदार उलटे होण्याची शक्यता आहे.गुंतवणूकदारांनी आकर्षक मूल्यांकनांमध्ये कमाईच्या अपेक्षा मंदावल्या असूनही सध्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्तीच्या संकेतांमुळे समर्थित रचनात्मक दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे दिलासा मिळाला म्हणून आयटी निर्देशांक वर गेला.'