लहान मुलांसाठी सनस्क्रीन वापरावे का ? कशी घ्याल त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी!

मुंबई : लहान मुलांची काळजी घेणं असं प्रत्येक पालकांना वाटतं. ऋतूनुसार लहान मुलांच्या त्वचेसाठी काय गरजेचं आहे आणि काय नाही असा प्रश्न नेहमीच पालकांना उपस्थित होत असतो. मात्र, बाजारात आता लहान मुलांसाठी सुद्धा बऱ्याच प्रकारच्या क्रीम किंवा मॉइश्चुरायझर आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रत्येक पालक आपल्या बालकाची योग्य ती काळजी घेत असतात. प्रौढांसाठी सनस्क्रीन वापरणे हे आता सर्वसामान्य झाले आहे, पण लहान मुलांसाठी सनस्क्रीन आवश्यक आहे का? आणि ते त्यांच्या नाजूक त्वचेसाठी सुरक्षित आहे का? हा प्रश्न अनेक पालकांना पडतो.


त्वचारोगतज्ञांच्या मते, मुलांची त्वचा अतिशय कोमल आणि संवेदनशील असते. त्यामुळे सूर्याच्या हानिकारक UVA आणि UVB किरणांचा त्यावर लगेच परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, प्रौढांप्रमाणेच लहान मुलांनीही सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.


एफडीएनुसार, सहा महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांसाठी सनस्क्रीन वापरणे सुरक्षित आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर पालकांनी मुलांच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी योग्य सनस्क्रीन वापरावे.


मुलांसाठी सनस्क्रीन निवडताना काय लक्षात घ्यावे?


ब्रॉड स्पेक्ट्रम असलेले सनस्क्रीन निवडा, जे UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करते.


SPF १५ ते ३० असलेले सनस्क्रीन मुलांसाठी पुरेसे असते.


ऑक्सिबेन्झोनसारखी रसायने असलेले उत्पादने टाळावीत, कारण ती डोळ्यांना त्रास देऊ शकतात.


सनस्क्रीन व्यतिरिक्त इतर उपाय काय करावेत?
उन्हाळ्यात मुलांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे, टोपी घालणे आणि अंग झाकणारे हलके कपडे परिधान करणे फायदेशीर ठरते.


मुलांची त्वचा अधिक संवेदनशील असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य सनस्क्रीन आणि योग्य सवयींमुळे त्यांना उन्हापासून चांगले संरक्षण मिळू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. यातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)

Comments
Add Comment

प्रसिद्ध मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये घडला 'हा' धक्कादायक प्रकार, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा' सदस्य बाहेर जाणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन सध्या दोरदार चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला ७० दिवस झाले आहेत. तर, आता शेवटचे ३० दिवस

Ranveer Singh : प्रसिद्ध कलाकार होण्यापूर्वी रणवीरसोबत घडला 'हा' घृणास्पद प्रकार

- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'ला मुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम

Bigg Boss Marathi 6 : बीग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तारीख ठरली ?

मुंबई : बीग बॉस मराठी ६ सीजन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सीजनची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला

सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी

मुंबई : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला

Sonalee Kulkarni Manjula song : मंजुळा गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी महाराष्ट्राची अप्सरा सज्ज

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात