दौऱ्याचा कार्यक्रम
राष्ट्रपती मुर्मूंच्या या दौऱ्याचा प्रमुख उद्देश गुजरातच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक केंद्रांना भेट देणे तसेच विविध समुदायांशी संवाद साधणे हा आहे.
९ ऑक्टोबर- राष्ट्रपती आज सायंकाळी राजकोट येथे दाखल होतील, तेथून त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची औपचारिक सुरुवात होईल.
१० ऑक्टोबर - या दिवशी राष्ट्रपती सर्वप्रथम सोमनाथ मंदिराला भेट देतील आणि तेथे दर्शन व आरती करतील. सोमनाथ हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. त्यानंतर, त्या गीर राष्ट्रीय उद्यानात जातील. सासन गीर येथे त्या स्थानिक आदिवासी समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. हा संवाद सामाजिक समावेशकता आणि आदिवासी कल्याणाबद्दलची त्यांची तळमळ दर्शवतो.
११ ऑक्टोबर - दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती द्वारका येथील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर त्या अहमदाबाद येथे दाखल होतील आणि गुजरात विद्यापीठाच्या ७१ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या या विद्यापीठातील दीक्षांत समारंभात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.