Netweb Technologies Stock Fall: Netweb Technologies कंपनीचा शेअर दिवसभरात ७% कोसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:नेटवेब टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअर्समध्ये आज इंट्राडे ७% पातळीपर्यंत घसरण झाली आहे. काल कंपनीने बंगलोरस्थित बड इकोसिस्टीमशी (Bud Ecosystem) भागीदारी घोषित केल्यानंतर आज नफा बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणात सेल ऑ फ झाल्याने शेअर सत्राच्या सुरुवातीलाच कोसळला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोलूशन बनवण्यासाठी नेटवेब टेक्नॉलॉजीकडून एंटरप्राईज ग्रेड कामगिरी करणाऱ्या सिस्टिमसोबत Bud AI सॉफ्टवेअरशी धोरणात्मक भागीदारी केली. परिणामी आज मात्र शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आगामी नफा बुकिंगसाठी कंपन्यांनी शेअरवर अधिक विक्री पसंत केली. उपलब्ध माहितीनुसार, हे एआय आधारित उत्पादन शैक्षणिक, रिटेल, हेल्थकेअर, शेतकी व इतर व्यवसाय सोलूशन पर्याय बाजारात देण्यासाठी बनवण्यात येणार आहे.


कंपनीचा शेअर दुपारी १२.०६ वाजेपर्यंत ६.४४% कोसळत एनएसईवर ४०७९.३० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. गेल्या एक महिन्यापासून शेअरची किंमत ४१% उसळली होती. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना व्यापक निर्देशांकात मोठा फायदा झाला होता. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी ५०० रुपयांच्या प्राईज बँडसह बाजारात उतरला.मात्र कंपनीच्या शेअर ४४७९ या ५२ आठवड्यातील सर्वाधिक उच्चांकी पातळीवर या वर्षात पोहोचला असल्याने गुंतवणूकदारांना चां गला परतावा (Returns) या शेअरने दिले आहेत.


बड इकोसिस्टम ही बेंगळुरूस्थित एआय संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे जी मल्टी-मॉडल जनरेटिव्ह एआयमध्ये विशेषज्ञ आहे. कंपनीने २० हून अधिक मॉडेल्स ओपन-सोर्स केले आहेत, ज्यात मोठ्या भाषा मॉडेल्स, प्रसार मॉडेल्स, लहान भाषा मॉडेल्स आ णि कोडजेन मॉडेल्सचा समावेश आहे.भागीदार मर्यादित कनेक्टिव्हिटी किंवा तांत्रिक संसाधनांसह वातावरणात एआय क्षमता प्रदान करण्यासाठी ऑप्टिमाइझ केलेले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रित करून एआय-इन-अ-बॉक्स प्री-कॉन्फिगर केलेले सिस्टम विकसित करतील.


'बड इकोसिस्टमसोबतचे आमचे सहकार्य भारताच्या डिजिटल वाढीसाठी विश्वासार्ह, स्केलेबल आणि समावेशक संगणकीय पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला बळकटी देते,' असे नेटवेबचे तंत्रज्ञानाचे उपाध्यक्ष स्वस्तिक चक्रवर्ती म्हणाले.

Comments
Add Comment

Pune Traffic : रस्तेबंदीच्या फलकांमुळे पुणेकर चक्रावले! सायकल स्पर्धेसाठी ९ ते ६ रस्ते बंद की टप्प्याटप्प्याने? पाहा नेमके बदल काय?

पुणे : पुणे शहरात आज, शुक्रवारी (२३ जानेवारी) 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा

बार्ट्रॉनिक्स लिमिटेड एस एन एन कंपनीचे अधिग्रहण करणार

मोहित सोमण: बार्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bartronics Limited) कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये एसएनएन (Shree Naga Narasimha Private Limited SNN) कंपनीचे

बाजारात किरकोळ घसरण आज गुंतवणूकदारांनी निवडक शिस्तबद्ध गुंतवणूक का करावी? वाचा आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आज पुन्हा एकदा किरकोळ घसरणीकडे कौल गेला असल्याचे स्पष्ट होते. कालच्या बाजारातील

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक