विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक


नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली. सिरपमध्ये शरीराला अपायकारक घटक मिसळण्यात आले. हे औषध ज्या चिमुरड्यांना देण्यात आले त्यांची तब्येत बिघडल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. तब्येत खालावली आणि मध्य प्रदेशमधील २३ बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. इथून पुढे कोणत्याही कफ सिरपची प्रत्येक बॅच तयार करण्याआधी त्याची चाचणी घेण्याचे बंधन सरकारने घातले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औषध विक्रेत्यांना कोल्ड्रिफचा साठा असल्यास कंपनीकडे परत पाठवून द्या, असे आदेश दिले आहेत.


विषारी कफ सिरप प्रकरणी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील घर आणि कांचीपुरम येथील कारखान्याला कुलुप लावून पत्नीसोबत फरार झाले होते. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने दोन दिवस तामिळनाडूतील चेन्नईत ठिकठिकाणी धाडी टाकल्या. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांच्यावर 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली.


याआधी पाच ऑक्टोबर २०२५ रोजी छिंदवाडातील परासिया पोलीस ठाण्यात औषध निर्माता कंपनी श्रीसन फार्माचे संचालक मंडळ, बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी आणि इतर जबाबदार व्यक्तींविरोधात कलम १०५ आणि २७६ तसेच ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० अंतर्गत कलम २७ अ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सिरप नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवल्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये अनेक चिमुरड्यांना त्रास झाला. या प्रकरणात पोलिसांनी बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी आणि श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक केली आहे. छिंदवाडा पोलीस अधीक्षक अजय पांडे यांच्या नेतृत्वातील विशेष तपास पथकाने धडक कारवाई केली.


Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा