मोहित सोमण: शेवटच्या दिवशी टाटा कॅपिटल आयपीओला मंद प्रतिसाद मिळत आहे. ६ ते ८ ऑक्टोबर कालावधीत टाटा कॅपिटलचा आयपीओ बाजारात दाखल झाला होता. परंतु दोन दिवस समाधानकारक प्रतिसाद मिळाल्यानंतर अखेरच्या दिवशी प्रभाव मं दावला असल्याचे चित्र दिसत आहे.आकडेवारीनुसार, शेवटच्या दिवशी दुपारी १.३३ वाजेपर्यंत कंपनीच्या आयपीओला १.३५ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये पब्लिक इशूपैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडू न ०.९३ पटीने, २.०१ पटीने पात्र संस्थात्मक गुं तवणूकदारांक डून तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.४३ पटीने आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले आहे. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ४६४१.८३ कोटींची उभारणी केली होती. १५५११.८७ कोटींच्या आयपीओला बाजारात आतापर्यंत तुल नात्मकदृष्ट्या समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे. दुपारी १.३८ वाजेपर्यंत एकूण आयपीओतील सबस्क्रिप्शनपैकी एक्स अँकरकडून २.०१ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.४४ पटीने, तर किरकोळ गुंतवणूकदारांकडून १.६८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे.
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ९४९२४८५६ शेअर ऑफरिंग बदल्यात १९१०९३९८२ शेअरचे बिडिंग मिळाले होते. तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ७११९३६४२ शेअर ऑफरिंग बदल्यात १०२२८३६२२ शेअर्सचे बिडिंग आयपीओत मिळाले आहे. कि रकोळ गुंतवणूकदारांकडून मात्र तुलनात्मकदृष्ट्या कमी प्रतिसाद मिळत १६६११८४९८ शेअर तुलनेत १५४५१७१७४ शेअर्सचे बिडिंग मिळाले होते. ४७.५८ कोटी इक्विटी शेअर्सचा हा आयपीओ असून Kotak Mahindra Capital कंपनी आयपीओसाठी बुक लि डिंग मॅनेजर असून MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.
टाटा कॅपिटल लिमिटेड (TCL) टाटा समुहाची फ्लॅगशिप एनबीएफसी कंपनी आहे. ही एक वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनी आहे आणि टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी आहे. TCL भारतात एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) किरकोळ, कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ग्राहकांना विस्तृत श्रेणीची वित्तीय उत्पादने आणि सेवा देते. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) १३८३८२.७३ लाख कोटी रुपये आहे तर या आर्थिक वर्षात कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ५६© महसूल मिळाला होता तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात १०% वाढ इयर ऑन इयर बेसिसवर मिळाली होती.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतून मिळालेल्या निधीचा वापर कंपनीच्या भविष्यातील भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या टियर-आय कॅपिटल बेसमध्ये वाढ करणार ज्यामध्ये पुढील कर्ज देणे समाविष्ट असणार आहे असे कंपनीकडून स्पष्ट केले गेले होते