RBI Update: २८००० कोटी रूपयांच्या सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूकीची चालून आली संधी १० ऑक्टोबरला होणार विक्री

प्रतिनिधी:अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठी आरबीआय भांडवली बाजारात हस्तक्षेप करत असते. या धोरणाचा भाग म्हणून चलनी व्यवहार नियंत्रित करण्यासाठी आरबीआय वेळोवेळी मार्केट ऑपरेशन करत असते. यावर आधारितच आरबीआयने दिलेल्या माहितीत म्हटल्याप्रमाणे, बँक १० ऑक्टोबरला २८००० कोटींच्या सरकारी सिक्युरिटीजची विक्री करणार आहे. विना स्पर्धा बिडिंग (बोली) ही सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत व स्पर्धात्मक बिडिंग हे सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत होणार आहे ‌ आरबीआयच्या मुंबई येथील कार्यालयात हे कार्य पार पडणार आहे. तसेच आरबीआयचे ऑनलाईन व्यासपीठ असलेले इ कुबेर व्यासपीठावरून हा कार्यक्रम पार पडणार आहे. माहितीनुसार, दोन दीर्घकालीन बाँडची पुर्नविक्री (Re Issue) होणार आहे.ही विक्री मल्टिपल प्राईज ऑक्शन पद्धतीनुसार होणार असल्याचे आरबीआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये नमूद केले आहे. तसेच या विक्री अंतर्गत प्रत्येक सिक्युरिटीजमागे अधिकचे २००० कोटी रुपये उभारणी करण्याचाही पर्याय खुला ठेवल्याचे आरपीआयने यावेळी स्पष्ट केले. या म ल्टिपल प्राईज ऑक्शन पद्धतीत बोली लावणाऱ्या व्यक्तीला त्या बोली लावलेल्या किंमतीत अथवा ठरवलेल्या चिन्हांकित केलेल्या किंमतीवर या सिक्युरिटीज विकल्या जातील असे आरबीआयने म्हटले आहे.


किरकोळ गुंतवणूकदार सुद्धा या गुंतवणूकीत सहभाग नोंदवू शकतात. विना स्पर्धा बिडिंगमध्ये किरकोळ (Retail) गुंतवणूकदार RBI Retail Direct Portal या संकेतस्थळावर भेट देऊन आपली गुंतवणूक करू शकतात. त्या बिडींग स्विकारार्य असतील का नाही याचा अंतिम निर्णय आरबीआयच्या हातात असणार असून त्या संपूर्ण स्विकारल्या जातील का अर्ध्या यांचा संपूर्ण हक्क आरबीआयकडे असेल असे सेंट्रल बँकेने आपल्या अधिसूचनेत नमूद केले आहे. त्या बोली का नाकारल्या गेल्या यांचे स्पष्टीकरण देण्यासही आरबीआय बांधील राहणार नाही.


गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त स्पर्धात्मक बोली लावू शकतात परंतु एकत्रित एकूण बोली लिलावासाठी अधिसूचित रकमेपेक्षा जास्त नसावी असे आरबीआयने म्हटले. ही विक्री सरकारच्या नियमित बाजार कर्ज कार्यक्रमाचा एक भाग आहे ज्याचा उद्देश आर्थिक गर जा व्यवस्थापित करणे आणि देशांतर्गत कर्ज बाजारात तरलता (Liquidity) राखणे आहे.लिलावाच्या (Bidding) दिवशी सकाळी ९:०० ते ९:३० दरम्यान अतिरिक्त स्पर्धात्मक अंडररायटिंग (Additional Competition Underwriting ACU) भागाच्या अंडर रायटिंगसाठी बोली सादर करण्यासाठी आरबीआयने प्राथमिक विक्रेत्यांना संधी दिली आहे. हे बाँड ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान "जेव्हा जारी केले जातात (When Issued) " ट्रेडिंगसाठी पात्र असतील, ज्यामुळे अधिकृत जारी तारखेपूर्वी त्यांना व्यवहार करता येऊ शकतात.


सरकारी सिक्युरिटीजविषयी महत्वाचे म्हणजे १६,००० कोटी रुपयांच्या सरकार सिक्युरिटीज २०४० च्या ६.६८% आणि १२००० कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज २०६५ च्या ६.९०% निविदा (Tender) काढले जाईल. यशस्वी बोलींसाठी सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी तो डगा काढला जाणार आहे असे आरबीआयने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी