'प्रहार' Stock Market: अखेर पाचव्या दिवशी मात्र घसरण चार दिवसांच्या रॅलीला ब्रेक बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू

मोहित सोमण:सलग चार वेळा शेअर बाजारात झालेल्या वाढीनंतर आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ब्रेक लागला आहे. शेअर बाजारातील सकाळची किरकोळ वाढ अखेर घसरणीत बदलली. सेन्सेक्स १५३.०९ अंकांने कोसळला असून ८१७७३.६६ पात ळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ६२.१५ अंकांने घसरत २५०४६.१५ पातळीवर स्थिरावला आहे. बहुतांश आयटी शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे दिलासा मिळाला असला तरी इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात झालेल्या घसरणीचा फटका निर्देशांकात जाणवतो आहे. स र्वाधिक घसरण मिडिया, ऑटो ,फार्मा, पीएसयु बँक, रिअल्टी समभागात झाली असल्याने आज मात्र बाजाराला सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. अंतिमतः आज अखेर शेअर बाजाराला ब्रेक लागल्याने मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. सका ळी दीड टक्क्यांपर्यंत वाढला असलेला वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक अखेरीस २.६१% पातळीवर बंद झाला ज्यामुळे मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाले ज्यामध्ये निफ्टी मिडकॅप ५० (०.७४ टक्के) आणि निफ्टी स्मॉलकॅप ५० (०.५० टक्के) घसरले.


दुसरीकडे आज जागतिक बाजारपेठेत अस्थिरता कायम दिसून आली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात आज एस अँड पी ५०० (०.३८%), नासडाक कंपोझिट (०.६७%) निर्देशांकात घसरण झाली असून डाऊ जोन्स (०.१५%) निर्देशांकात वाढ झाली आहे. काल अमेरिकेतील व्यापक निर्देशांकात आयटी शेअर विशेषतः ऑरेकल कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरण झाली. आजही कल घसरणीकडे कायम आहे. अस्थिरतेमुळे जागतिक पातळीवरील कमोडिटीवर दबाव कायम असल्याने आजही सोने प्रचंड मोठ्या पातळीवर पोहोचले आहे. दुसरीकडे ओपेकने उत्पादनात वाढ करण्याचे ठरवले असताना काही दिवस घसरलेले कच्चे तेल आज मोठ्या प्रमाणातील वाढलेल्या स्पॉट मागणीमुळे उसळले आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात तब्बल १.१०% व Brent Future निर्देशांकात १.०४% वाढ झाली आहे.


आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात कौल घसरणीकडे असल्याने शांघाई कंपोझिट (०.५२%) वगळता इतर सर्व निर्देशांकात घसरण कायम आहे. जागतिक बँकेने चीनच्या सकल देशांतर्गत उत्पादनात वाढीचे संकेत दिल्यानंतर आग्नेय आशिया व इतर आशि याई देशांतील विकास व निर्यात शिथील होऊ शकते असे निरिक्षण नोंदवले होते. युएस बाजारातील अतिरिक्त टॅरिफचा दबाव आशियाई बाजारात आजही कायम दिसला.टायटन, टेक महिंद्रा,इन्फोसिस,टीसीएस, एचसीएल या बड्या आयटी शेअर्समध्ये वाढ झा ल्याने आयटी क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या विश्वासात भर पडली. तर दुसरीकडे टाटा स्टील आणि बजाज फायनान्स यांनीही वाढ नोंदवली आहे . तर दुसरीकडे अनेक हेवीवेट शेअर्सना विक्रीचा दबाव आल्याने बाजारात सेल ऑफ झाले. टाटा मोटर्स,एम अँड एम ,बीईएल, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड या बड्या ब्लू चिप्स शेअर्समध्ये घसरण झाली आहे.आयटी आणि निवडक ग्राहक केंद्रित समभागांच्या नेतृत्वाखाली बाजार सावधपणे सकारात्मक राहिला, ज्याला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून काढलेल्या गुंतवणू कीचा पाठिंबा मिळाला आहे. लवकरच टीसीएससह अनेक कंपन्याचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे गुंतवणूकदार नजीकच्या काळात मार्गदर्शनासाठी जागतिक संकेत, कमाईचे अपडेट आणि क्षेत्रीय कामगिरी पाहण्याची शक्यता आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ आयटीआय (१०.०३%), सोनाटा सॉफ्टवेअर (५.५८%), आरबीएल बँक (४.७२%), टायटन कंपनी (४.३१%), आयएफसीआय (४.३१%), इंडियामार्ट (३.८८%), करूर वैश्य बँक (२.८८%), आयआयएफएल फायनान्स (२.९३%), आनंद राठी वेल्थ (२.६२%), इन्फोसिस (२.५०%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (१.९१%), टीसीएस (१.८८%) समभागात झाली आहे.अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण आरएचआय मॅग्नेस्टा (६.०५%), एबी लाईफस्टाईल (५.६७%), अनंत राज (४.८५%), एनएलसी इं डिया (४.८२%), ओबेरॉय रिअल्टी (३.८३%), गोदरेज इंडस्ट्रीज (३.८०%), झी एंटरटेनमेंट (२.८८%), आदित्य बिर्ला कॅपिटल (२.७२%), हुडको (२.४८%), जेएसडब्लू एनर्जी (२.४८%), भेल (२.८८%), टाटा मोटर्स (२.३६%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'राष्ट्रीय निर्देशांकांमध्ये अस्थिर सत्र दिसून आले, ते तीव्र तेजीनंतर नफा बुकिंगमुळे मंदावले. दुसऱ्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामापूर्वी गुंतवणूकदारांची सावधगिरी कायम राहिली, कारण बाजारातील सहभागींनी मूल्यांकन आणि वाढीच्या शक्यतांचे पुनर्मूल्यांकन केले. क्षेत्रीय ट्रेंड मिश्रित होते - लवचिक मागणी आणि आकर्षक मूल्यांकनांवर आयटी समभागांनी चांगली कामगिरी केली, तर ऑटो, बँकिंग आणि एफएमसीजी यांना नफा घेण्याच्या दबावाचा सामना करावा लागला. वाढलेली जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकन सरकारच्या चालू बंदमुळे सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला, जोखीम टाळण्याचे प्रमाण वाढले आहे.फेडच्या धो रणात्मक भूमिकेवरील संकेतांसाठी आता लक्ष सप्टेंबरच्या एफओएमसी मिनिटांकडे वळते.पुढे जाऊन, जागतिक घडामोडी प्रासंगिक राहिल्या तरी, बाजाराचे लक्ष देशांतर्गत उत्पन्न, मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि आगामी सणासुदीच्या हंगामाकडे वळण्याची शक्य ता आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च सिद्धार्थ खेमका म्हणाले आहेत की,'सत्राच्या सुरुवातीपासूनच नफा बुकिंग सुरू झाल्याने निफ्टी २५०४६ पातळीवर स्थिरावला,जो ६२ अंकांनी (-०.२५%) घसरला. व्यापक निर्देशांकांनी कमी कामगिरी केली, निफ्टी मिडकॅप१०० ०.७% ने आणि स्मॉलकॅप१०० ०.५% ने घसरले. क्षेत्रीयदृष्ट्या, बहुतेक निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते, जे सावधगिरीचे सूचक आहे. उद्या होणाऱ्या TCS च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी आशावादामुळे निफ्टी आयटी सर्वाधिक वाढणारा (+१.५%) होता, तर निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स ०.८% वाढले. दुसरीकडे, निफ्टी मीडिया (-१.७%) आणि ऑटो (-१.५%) घसरणीचे नेतृत्व करत होते. टायटनने त्यांच्या देशांत र्गत दागिन्यांच्या व्यवसायात १९% वार्षिक वाढ नोंदवल्याने ज्वेलरी स्टॉक फोकसमध्ये होते. याव्यतिरिक्त, बेस मेटलने त्यांची वाढ वाढवली, गेल्या आठवड्यात झिंक आणि तांबे दोन्ही जवळजवळ ५% वाढले. संस्थात्मक आघाडीवर, FIIs ने १४४० कोटींच्या निव्व ळ गुंतवणुकीसह खरेदीदार बनले, तर DIIs ने पाठिंबा दिला, मंगळवारी आणखी ४५० कोटींची भर पडली. जागतिक स्तरावर, उद्या जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या सुरुवातीच्या बेरोजगार दाव्यांच्या डेटाकडे लक्ष वेधले जाईल. जागतिक संकेत आणि दुसऱ्या तिमा हीतील उत्पन्नाच्या घोषणांचा मागोवा घेत, नजीकच्या काळात बाजारपेठा श्रेणीबद्ध राहतील अशी अपेक्षा आहे.'

Comments
Add Comment

Gold Silver Rate Today: सोने सलग तिसऱ्यांदा नव्या उच्चांकावर! आकडे पाहून कापरे भरणार? सोने १२३००० पार, चांदीतही पराकोटीची वाढ

मोहित सोमण: एकीकडे मजबूत जागतिक फंडामेंटल व दुसरीकडे आर्थिक अस्थिरता या दोन कारणांमुळे कमोडिटीतील दबाव आणखी

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण

ITI Share Surge: १४% उसळी घेतलेला ITI Ltd शेअर नक्की आहे काय? कुठल्या कारणामुळे शेअर All time High जाणून घ्या

मोहित सोमण:भारत सरकारच्या उपक्रमांअंतर्गत (Government of India Undertaking)असलेली छोटी कंपनी आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आज

मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. मोदींनी बटण

RBI FX Retail Bharat Connect Linkage: आता एका अँपमधील क्लिकवर रूपयांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर खरेदी करणे शक्य आरबीआयचे मोठे पाऊल!

प्रतिनिधी:एफएक्स-रिटेल-भारत कनेक्ट लिंकेजमुळे सहभागी बँकांमध्ये बँक खाते असलेल्या वैयक्तिक ग्राहकांना सहभागी

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची पुढील 'सर्वोच्च' सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष म्हणजेच शिवसेना असा निर्णय