नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन

लंडनस्थित झहा अदीद या वास्तूविशारद कंपनीने केलंय डिझाइन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळाची एक वेगळीच झलक नागरिकांना पाहायला मिळणार असून, त्याची वास्तुकला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या विमानतळाचे डिझाईन लंडनस्थित झहा अदीद या वास्तुविशारद कंपनीने केले आहे. भारतीय संस्कृतीपासून प्रेरित होऊन आणि राष्ट्रीय फुल असलेल्या कमळाच्या संकल्पनेवर आधारित 'तरंगणारे कमळ' हे विमानतळाचे केंद्रबिंदू आहे.

खरं तर मुंबई महानगरातील दुसरं मोठं हे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळामुळे या परिसरातील आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हापासून या विमानतळाच्या प्रकल्पाचं काम सुरु होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी हवाईदलाचे सी-२९५ आणि सुखोई या दोन विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं होतं. या यशस्वी चाचण्यांनंतर आता या विमानतळाचं उद्घाटन पार पडत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत या विमानतळाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी दिग्गज नेते या उद्घाटनासाठी उपस्थित असणार आहेत.

विमानतळाच्या काही खास वैशिष्ट्यांचा आढावा

विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला होणार असले, तरी पहिले विमान डिसेंबर महिन्यात उड्डाण घेणार आहे. पहिल्या उड्डाणासाठी एअर इंडिया, इंडिगो किंवा अकासा एअर यापैकी कोणते विमान असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानतळाला चार मुख्य प्रवेशद्वार आणि तीन केंद्रे आहेत. अल्फा, ब्रावो आणि चार्ली. त्याचबरोबर, एकूण ८८ चेक-इन काऊंटर असून, यापैकी ६६ काऊंटरवर कर्मचाऱ्यांनद्वारे चेक-इन केले जाईल, तर २२ काऊंटरवर सेल्फ चेक-इनची सुविधा असेल. सुरुवातीच्या काळात विमानसेवा सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेतच सुरू राहील. विमानतळाची पूर्ण क्षमता ४० एटीएम इतकी असली तरी प्रारंभी फक्त १० एटीएम वर ऑपरेशन सुरू होईल, म्हणजे तासाला दहा विमानांची उड्डाणे किंवा लँडींग होऊ शकतील.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सोयी

- पाऊस किंवा धुक्याच्या काळात सुरक्षित लँडिंगसाठी अत्याधुनिक नॅव्हिगेशन आणि सेफ्टी सिस्टम्स बसवण्यात आल्या आहेत.
- डिजी यात्रा तंत्रज्ञान लागू करण्यात आले असून, यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
- पारंपरिक फूड कोर्टऐवजी येथे फूड हॉल संकल्पना आणण्यात आली आहे, जिथे प्रवासी विविध स्टॉल्सवरून एकत्रित ऑर्डर देऊन जेवण मिळवू शकतील.
- विमानतळ परिसरात भारतीय कलावैभवाचे दर्शन घडवणाऱ्या डिजिटल इंस्टॉलेशन्स, फॅब्रिक फॉरेस्ट, आणि धाग्यांच्या कलाकृतींनी सजावट करण्यात येणार आहे.

दि.बा.पाटील यांचं नाव?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.त्या पार्श्वभीवर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची ग्वाही सरकारने दिलेली आहे. खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती तर मिळणार आहे. तसेच हजारो रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि