पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI) सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा सात महिन्यांच्या ब्रेकनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करत आहे. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरही रोहित शर्मासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण त्याला पहिल्याच सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.
काय आहे तो विक्रम?
सध्या रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुमारे ९९० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. फक्त १० धावा जोडल्यास त्याच्या १००० धावा पूर्ण होतील, ज्यामुळे तो ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल.
'हिटमॅन'ची कामगिरी आणि आगामी रेकॉर्ड
रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच उत्कृष्ट फॉर्ममध्ये असतो. त्याला ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर फटकेबाजी करायला आवडते. आगामी ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामन्यांच्या या दौऱ्यात 'हिटमॅन'चे लक्ष्य केवळ १० धावा पूर्ण करून हा टप्पा गाठण्याचे नसून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याकडे असेल.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५
पहिली ODI - रविवार १९ ऑक्टोबर - पर्थमधून सकाळी ९ पासून LIVE
दुसरी ODI - गुरुवार २३ ऑक्टोबर - अॅडलेडमधून सकाळी ९ पासून LIVE
तिसरी ODI - शनिवार २५ ऑक्टोबर - सिडनीतून सकाळी ९ पासून LIVE
पहिली T20I - बुधवार २९ ऑक्टोबर - कॅनबेरातून दुपारी १.४५ पासून LIVE
दुसरी T20I - शुक्रवार ३१ ऑक्टोबर - मेलबर्नमधून दुपारी १.४५ पासून LIVE
तिसरी T20I - रविवार २ नोव्हेंबर - होबार्टमधून दुपारी १.४५ पासून LIVE
चौथी T20I - गुरुवार ६ नोव्हेंबर - गोल्ड कोस्टमधून दुपारी १.४५ पासून LIVE
पाचवी T20I - शनिवार ८ नोव्हेंबर - ब्रिस्बेनमधून दुपारी १.४५ पासून LIVE