
मोहित सोमण: एकीकडे मजबूत जागतिक फंडामेंटल व दुसरीकडे आर्थिक अस्थिरता या दोन कारणांमुळे कमोडिटीतील दबाव आणखी वाढल्याने सलग तिसऱ्यांदा सोने आणखी एका जागतिक उच्चांकावर पोहोचले आहे. कमोडिटी बाजारातील एमसीएक्सम ध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये प्रथमच सोन्याने दर एकाच सत्रात १७०० रूपयांनी वाढले होते. तर भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दराने १२३००० आकडा पार केला आहे.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १९१ रूपये, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १७५ रूपये, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १४३ रूपयांनी उसळला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२३९३ रूपये, २२ कॅरेटसाठी ११३६० रूपये, १८ कॅरेटसाठी ९२९५ रूपयांवर पोहोचले आहे त.संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति तोळा दर २४ कॅरेटमागे १९१० रूपयांनी, २२ कॅरेटमागे १७५० रूपयांनी, १८ कॅरेटमागे १७५० रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सोन्याचे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२३९३० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ११३६०० रुपयांवर,१८ कॅरे टसाठी ९२९५० रूपयांवर पोहोचले आहेत.
याशिवाय भारतीय सराफा बाजारात मुंबईसह इतर महत्वाच्या शहरात सोन्याचा प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२३९३ रूपये, २२ कॅरेटसाठी ११३६० रूपये, १८ कॅरेटसाठी ९२९५ रूपयांवर गेला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये सो न्याचा निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.३४% वाढ झाल्याने सोन्याची दरपातळी १२२७३१ रूपयांवर गेली आहे.
जागतिक पातळीवर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.३०% वाढ झाली आहे.तर जागतिक पातळीवरील मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.२९% वाढ झाली आहे.आज दिवसभरातच सोन्याच्या किं मतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष (ETF) कमोडिटीतील मागणीमुळे मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात घसरण झाली. तसेच युएस बाजारातील शट डाऊन सुरू असताना आगामी काळातील जागतिक अस्थि रता कायम आहे. महागाईचे आकडेही युएस बाजारातील सक्षम नसल्याने आगामी काळात राजकीय, आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी फेड व्याजदरात कपात होईल अशी आशा जगभरातील गुंतवणूक करत आहेत. तत्पूर्वी सुरक्षित परताव्यासाठी पर्याय म्ह णून सोन्याचा वाढता प्रभाव सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.
विशेष म्हणजे एमसीएक्स गोल्डने पहिल्यांदाच आज प्रति १० ग्रॅम १२२००० चा टप्पा ओलांडला आणि १२३०८० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. एमसीएक्स सिल्व्हरनेही प्रति किलो १४९१३८ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. एमसीएक्स गोल्ड डिसेंबर फ्युचर्स १.३८% वाढून १२२७८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. त्यावेळी एमसीएक्स सिल्व्हर डिसेंबर फ्युचर्स २.११% वाढून १४८८७० रुपये प्रति किलोवर पोहोचला असल्याने सोने नव्या उच्चांकावर पोहोचले.
डिसेंबर डिलिव्हरीसाठी अमेरिकन सोन्याचा वायदा बुधवारी प्रति ट्रॉय औंस ४००० डॉलर्सवरून ४०३७ डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. चालू राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांकडून जोरदार खरेदी, यूएस फेडकडून दर कपातीची अपेक्षा, सोन्याच्या ईटीएफमध्ये (Exchange Traded Fund ETF) मध्ये सुरू असलेली वाढती आवक (Inflow) तर दुसरीकडे डॉलरची कमकुवतता यासारख्या घटकांच्या संगमामुळे या वर्षी सोन्यात वाढ झाली. मात्र स्थानिक पातळीवर युएसने अतिरिक्त टॅरि फचा निर्णय घेतल्यानंतर, एच१बी व्हिसावरील निर्णयानंतर व फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात रूपयावर दबाव निर्माण झाला होता. जागतिक पातळीवर ट्रेड बास्केट मध्ये मात्र डॉलरमध्ये एकत्रित घसरण झाली. या वर्षी आतापर्यंत दे शांतर्गत स्पॉट गोल्डच्या किमती ५५% हून अधिक वाढल्या आहेत.आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात तसेच व्याजदर कपातीच्या काळात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता असते.मंगळवारी अमेरिकन सरकारच्या शटडाऊनने सातव्या दिवशी प्र वेश केला.आता आगामी काळात गुंतवणूकदारांनी यूएस फेड बैठकीच्या मिनिटांवर आणि फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणावर लक्ष केंद्रित केले आहे, जे आगामी व्याजदर कपातीच्या व्याप्तीवर परावर्तित होईल असे वाटते.
चांदीतही भली मोठी वाढ !
आज सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरातही भलीमोठी वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही डॉलरच्या वाढत्या दराने दबाव पातळी निर्माण झाली. आगामी फेड व्याजदरात कपातपूर्व काळात युएस मधील शटडाऊन व आर्थिक अस्थिरतेचा फटका कमो डिटीत बसला आहे. भारतीय बाजारपेठेत देखील सणासुदीच्या काळात वाहनांना मोठी मागणी असते. जीएसटी संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वाढत्या मागणीत वाढ झाली आहे. वैयक्तिक वापरासह ईव्ही व इतर औद्योगिक उत्पादनातील वाढत्या माग णीमुळे चांदीत आज मोठी रॅली झाली. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज तब्बल ३ रुपयाने वाढ झाली असून प्रति किलो दरात ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदी १६० रूपयावर तर प्रति किलो दर १६ ०००० रूपयांवर पोहोचला आहे.भारतीय बाजारात मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १६०० रूपयांवर, तर प्रति किलो दर १६०००० रुपयांवर गेला आहे. जागतिक बाजारातील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत थेट २.३३% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.९१% वाढ झाल्याने चांदी दरपातळी १४८५७५ रूपयांवर गेली आहे.