येत्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची ठरली रणनिती, या मतदारांवर केंद्रबिंदू...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनात शिवसेनेने आपली रणनिती आखली असून येत्या निवडणुकीत महिला मतदारच केंद्रबिंदू ठेवण्यात आला. मागील विधानसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक असल्याने महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत महिलांचे मतदान अधिक वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. राज्यात लाडकी बहिण योजनेला यश मिळाल्यानंतर शिवसेनेकडून महिला वर्गांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहे.


शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना लागू केली होती. या योजनेच्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत महिला मतदानाचा टक्का वाढला. या वाढीव मतदानाचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. महायुतीचे निवडून आलेल्या २३५ आमदारांमध्ये शिवसेनेच्या ६० आमदारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईत एकूण ५५.४६ टक्के मतदान झाले होते. यात महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. मुंबईतील ५५.९२ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर ५५.०७ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले होते. मुंबईतील ३६ पैंकी २४ विधानसभा मतदार संघात महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा जास्त होता. त्यामुळे यंदा महिला मतदार मुंबई महापालिका निवडणुकीचा केंद्रबिंदू असेल. आणि महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करत शिवसेनेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.


लाडक्या बहिणींमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करणारी शिवसेनेची महामंगळागौर स्पर्धा नुकताच मुंबईत पार पडली. यात तब्बल ६००० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी भारती विद्या भवन येथे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महामंगळागौर स्पर्धेत मागाठाणे येथील कलादर्पण गटाने प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक भायखळा येथील शिवकन्या आणि तृतीय क्रमांक चेंबूर येथील चंद्रकोर गटाने पटकावला. “उत्सव मुंबईचा” सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत हनुमान सेवा मंडळाने पहिला क्रमांक पटकावला. निकदवरी लेन सार्वजनिक मंडळ (गिरगावचा राजा) आणि ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्दीचा राजा) यांना संयुक्तरित्या दुसरा क्रमांकाने गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक भांडुप येथील कोकण मित्र मंडळ आणि शिवाजी पार्क (हाऊस) यांना संयुक्तरित्या देण्यात आला. स्पर्धांचे आयोजन शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. “उत्सव मुंबईचा” स्पर्धेत मुंबईतील ४५० गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. यात ५० गणेश मंडळांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

Comments
Add Comment

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२

महापौर, उपमहापौरांसह समित्यांच्या अध्यक्षांच्या सारथ्यासाठी वाहने सज्ज

महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओ सचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच

शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला

मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेली मुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम